केएमटीचे आरटीओ निरीक्षक सुभाष देसाई यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 13:23 IST2020-06-13T13:21:27+5:302020-06-13T13:23:11+5:30
नेसरी (तालुका गडहिंग्लज) जवळील तळेवाडी गावचे सुपुत्र वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) व कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे (केएमटी) अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष नारायण देसाई ( वय ४९) यांचे काल रात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथे निधन झाले.

केएमटीचे आरटीओ निरीक्षक सुभाष देसाई यांचे निधन
नेसरी : नेसरी (तालुका गडहिंग्लज) जवळील तळेवाडी गावचे सुपुत्र वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) व कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे (केएमटी) अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष नारायण देसाई ( वय ४९) यांचे काल रात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथे निधन झाले.
तळेवाडी या जन्मगावी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ असा परिवार आहे.
भाऊ अरविंद हेदेखील कऱ्हाड येथे मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर वडील बीएसएनएलचे निवृत्त सेवक आहेत. सुभाष देसाई हे कोल्हापूरात आर के नगर परिसरात राहत होते. काल सायंकाळी सातच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
१९९७ च्या सुमारास त्यांनी आपल्या सेवेस प्रारंभ केला होता. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई व पुन्हा कोल्हापूर असा त्यांचा प्रवास होता. त्यांच्याकडे सहा महिन्यापूर्वी कोल्हापूरच्या केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक म्हणून कार्यभार होता. तो त्यांनी उत्कृष्ट सांभाळला होता. त्यांच्या निधनाने नेसरी परिसरात शोककळा पसरली आहे.