शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

pension day : पेन्शनसाठीही केएमटी कर्मचाऱ्यांच्या पदरी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:26 IST

आयुष्यातील २५ ते ३0 वर्षे संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करायचे आणि उतारवयात दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, अशी स्थिती केएमटीमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची झाली आहे. कामावर असताना दर महिन्याच्या पगारासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजविल्या. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठीही त्यांच्या पदरी संघर्ष आला आहे.

ठळक मुद्देपेन्शनसाठीही केएमटी कर्मचाऱ्यांच्या पदरी संघर्षतुटपुंज्या पेन्शनवर उदरनिर्वाह करायचा कसा : संतप्त कर्मचाऱ्यांचा सवाल

कोल्हापूर : आयुष्यातील २५ ते ३0 वर्षे संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करायचे आणि उतारवयात दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, अशी स्थिती केएमटीमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची झाली आहे. कामावर असताना दर महिन्याच्या पगारासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजविल्या. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठीही त्यांच्या पदरी संघर्ष आला आहे.महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी दर महिन्याला १0 तारखेची प्रतीक्षा करावी लागते. येथील कर्मचाऱ्यांना समाधानकारक पेन्शन आहे; मात्र केएमटी कर्मचाऱ्यांची वाईट स्थिती आहे. केवळ ८00 ते २५00 रुपये पेन्शनवरच त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. ही पेन्शन सुरू होण्यासाठी दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. तसेच संबंधितांचे हात ओले केल्याशिवाय पेन्शनची फाईल पुढे सरकत नाही.कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पेन्शन वेळेवर होत नाही. याबद्दल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. त्यांनी १ तारखेलाच पेन्शन देण्याचे आदेश दिले होते. काही महिने १ तारखेला पेन्शनही झाली. त्यांची बदली झाल्यानंतर काही महिन्यांतच हा नियम कागदावरच राहिला.

महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने पेन्शन वेळेवर होत नाही. १0 तारखेपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर येत आहे. वास्तविक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना औषध उपचारासाठी पैशाची गरज असते. दुसऱ्यांकडे पैसे मागण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे; त्यामुळे पूर्वीप्रमाणे १ तारखेलाच पेन्शन मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.केएमटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शनकेएमटीच्या कर्मचाऱ्यांचा त्रास सेवानिवृत्तीनंतरही संपत नाही, अशी स्थिती आहे. कामावर असताना वेळेवर पगार नसल्यामुळे सावकाराच्या दारात जाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे, तर सेवानिवृत्तीनंतर ८00 ते २५00 रु. पेन्शन मिळते. तुटपुंज्या पेन्शनमुळे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. वास्तविक पगाराएवढी पेन्शन देण्याचा निर्णय झाला असताना याची अंमलबजावणी होत नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उतारवयातही संघर्ष सुटलेला नाही.

 

  • महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी- सुमारे ३000
  • केएमटी- एक हजार
  • केएमटी कर्मचाऱ्यांना पेन्शन-८00 ते २५00 रु.

पगाराएवढी पेन्शन मिळाली पाहिजे

केएमटी कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन मिळाली पाहिजे. पेन्शन वाढीचा प्रस्ताव केंद्रीय पातळीवर मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्वरित पेन्शन सुरू होत नाही. तीन वर्षांनंतर पेन्शन सुरू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पगाराएवढी पेन्शन मिळालीच पाहिजे.सुभाष सावंत, केएमटी सेवानिवृत्त कर्मचारी 

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनkolhapurकोल्हापूर