नागरिकांच्या मागणीनुसार केएमटी बस सेवा पूर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 19:25 IST2021-01-01T19:22:53+5:302021-01-01T19:25:46+5:30
CoronaVirus Bus Kolhapur- कोरोनाची साथ कमी होत असून नागरिकांच्या मागणीनुसार के.एम.टी. बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. गुरुवारपासून मुडशिंगी, साळोखेनगर ते कागल, कणेरीमठ, शिवाजी विद्यापीठ या मार्गांवर बससेवा सुरू झाली.

नागरिकांच्या मागणीनुसार केएमटी बस सेवा पूर्ववत सुरू
कोल्हापूर : कोरोनाची साथ कमी होत असून नागरिकांच्या मागणीनुसार के.एम.टी. बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. गुरुवारपासून मुडशिंगी, साळोखेनगर ते कागल, कणेरीमठ, शिवाजी विद्यापीठ या मार्गांवर बससेवा सुरू झाली.
के. एम. टी. उपक्रमामार्फत प्रवाशांच्या मागणीनुसार बस सेवेत वाढ करण्यात येत असून, मंगळवारपासून ( दि. ४ जानेवारी) राजोपाध्येनगर ते मुडशिंगी, आपटेनगर-साळोखेनगर ते राजारामपुरीमार्गे कागल, कळंबा-शुगरमील-शिवाजी विद्यापीठ या मार्गांवरील बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे.
विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकरिता सवलत पास वितरण केंद्र आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रवासी नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.