शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

kirnotsav : अंबाबाईच्या किरिटापर्यंत पोहोचली किरणे, मुख्य दिवस 'आज'पासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 12:18 IST

श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा सुरू

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा सुरू झाला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पूर्ण किरणोत्सव झाला. मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचून किरिटापर्यंत त्यांचा प्रवास झाला.

या किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर गरुड मंडप, गणपती, कासव चौक, अशी टप्पे पूर्ण करत ६ वाजून १५ मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. तेथून पुढे ६ वाजून १७ ते १८ मिनिटांपर्यंत ती चेहऱ्यावरून किरिटापर्यंत पोहोचून लुप्त झाली. पूर्ण किरणोत्सव झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त झाले.दरम्यान, स्वच्छ वातावरण आणि किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर केल्याने रविवारी पूर्ण किरणोत्सव झाला. किरणोत्सव सोहळ्यातील मुख्य दिवस आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. या किरणोत्सव सोहळ्यानिमित्त घाटी दरवाजावरील घंटा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

किरणांची तीव्रता चारपटींनी अधिक

- हवेत धूलिकण नव्हते. स्वच्छ वातावरण होते. त्यासह शनिवारपेक्षा मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता रविवारी चारपटींनी अधिक होती. आर्द्रतादेखील अपेक्षेप्रमाणे होती. या सर्व स्थितीमुळे दुसऱ्या दिवशी पूर्ण किरणोत्सव झाला.- सूर्यकिरणे देवीच्या किरिटापर्यंत पोहोचली. नोव्हेंबरमधील किरणोत्सवात ढगाळ वातावरणाचा अडथळा निर्माण झाला होता. उत्तरायण कालखंडात सलग दोन दिवस वातावरण स्वच्छ राहिल्याने किरणोत्सव चांगला झाला.- त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत असल्याचे विवेकानंद कॉलेजमधील पदार्थविज्ञान व खगोलशास्त्र विभागप्रमुख प्रा. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.

किरणांचा प्रवास असा

महाद्वार कमान : ५ वाजून ३२ मिनिटे

गरुड मंडप : ५ वाजून ३६ मिनिटे

गरुड मंडप मध्य : ५ वाजून ४२ मिनिटे

गणपती मंदिर मागील बाजू : ५ वाजून ५३ मिनिटे

कासव चौक : ६ वाजून १ मिनिट

पितळी उंबरठा : ६ वाजून ४ मिनिटे

चांदीचा उंबरठा : ६ वाजून ८ मिनिटे

गर्भगृह पहिली पायरी : ६ वाजून १४ मिनिटे

चरण स्पर्श : ६ वाजून १५ मिनिटे

चेहरा ते किरीट : ६ वाजून १७ ते १८ मिनिटे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर