Kolhapur: किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १३ डिसेंबरला, ५० लघुपट दाखवणार

By संदीप आडनाईक | Published: December 9, 2023 12:59 PM2023-12-09T12:59:34+5:302023-12-09T12:59:52+5:30

डॉ. व्ही. एन. शिंदे यांना वसुंधरा सन्मान, सुहास वायंगणकर, डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशन, जलमित्र फाऊंडेशन, गार्डन क्लबला वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर

Kirloskar Vasundhara International Film Festival on 13th December | Kolhapur: किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १३ डिसेंबरला, ५० लघुपट दाखवणार

Kolhapur: किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १३ डिसेंबरला, ५० लघुपट दाखवणार

कोल्हापूर : किर्लोस्कर उद्योग समूहातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १३ ते १५ डिसेंबर दरम्यान वि. स.खांडेकर भाषा भवन येथे होणाऱ्या “किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५० लघुपट दाखवण्यात येणार आहे. या वर्षीचा हा १३ वा महोत्सव आहे.

कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना वसुंधरा सन्मान तर सुहास वायंगणकर, डॉ. व्ही. टी पाटील फाऊंडेशन, जलमित्र फाऊंडेशन, गार्डन क्लबला वसुंधरा मित्र पुरस्कार शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.

''सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ या विषयाशी संबंधित हा महोत्सव असून १३ डिसेंबरला स.१० वा. कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे सी.जी. रानडे, धिरज जाधव, वसुंधरा फेस्टिवल प्रमुख वीरेंद्र चित्राव, पर्यावरण विभागाच्या डॉ.ए.एस.जाधव यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

शुक्रवार दि.१५ रोजी दुपारी ३ वाजता, शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन हॉलमध्ये किर्लोस्कर वसुंधरा मित्र आणि वसुंधरा सन्मान पुरस्कार वितरण होईल. प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक आणि लेखक अतुल देउळगावकर, प्र.कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, किर्लोस्करचे सी जी.रानडे आणि धिरज जाधव तसेच पर्यावरण विभागाच्या डॉ. ए. एस. जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

फोटोग्राफी, चित्र-शिल्प प्रदर्शन

महोत्सवाच्या निमित्याने ‘कॅप्चर द नेचर’ ही फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केलेली आहे. येथे तीनही दिवस भाषा भवनच्या हॉलबाहेर हे फोटोग्राफी प्रदर्शन, तसेच चित्र - शिल्प प्रदर्शन आणि पर्यावरण पूरक सेवा आणि वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. महाविद्यालयीन व शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच कोल्हापुरातील नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक वस्तूंचा इको बझार

आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षानिमित्त दि.१४ ते १७ डिसेंबर दरम्यान तृणधान्ये आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा इको बझार स. १० ते संध्या. ७ वेळेत डॉ. व्ही. टी. पाटील फौंडेशन आणि स्वयंसिद्धा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भारत हौसिंग सोसायटी, राजारामपुरी ८ वी गल्ली येथे भरवण्यात येणार आहे.

Web Title: Kirloskar Vasundhara International Film Festival on 13th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.