शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

‘फॉर्म्युला रेसिंग’चा राजा ‘कृष्णराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 23:57 IST

वेगाशी स्पर्धा करणे आवडते : फॉर्म्युला वन कार रेसिंगमध्ये प्रवेश मिळवण्याचे ध्येय

कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीमधून तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, जलतरण स्पर्धेतून वीरधवल खाडे, आदींनी सातासमुद्रापार नेले आहे. त्यात क्रिकेटमध्ये अनुजा पाटील यांच्यापाठोपाठ थरारक क्रीडा प्रकार म्हणून गणल्या जाणाऱ्या फॉर्म्युला रेसिंग कारमध्ये कृष्णराज महाडिक यानेही आपला ठसा उमटविला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गो-कार्टिंग, फॉर्म्युला फोर या स्पर्धांमध्ये कोल्हापूरचा ठसा उमटविणाऱ्या कृष्णराज महाडिक याचा ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर्स क्लब (बीआरडीसी)मध्ये समावेश झाला आहे. शिवाय त्याला ख्रिस डिटमन रेसिंग टीमने करारबद्ध केले आहे. त्यातून त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या खेळ प्रकारात कोल्हापूरसह भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ‘कृष्णराज’शी केलेला थेट संवाद...प्रश्न : या थरारक क्रीडा प्रकाराची आवड कशी निर्माण झाली? उत्तर : मी सन २००७ मध्ये मोहितेज रेसिंग ट्रॅकवर धु्रव मोहिते यांच्यासह गो-कार्टिंग शर्यतीमध्ये सहभाग घेत होतो. प्रशिक्षक सचिन मंडोडी यांनी माझ्यातील रेसिंगमधील गुण हेरून आणखी सरावासाठी प्रोत्साहन दिले. पहिल्यापासून या खेळाची गोडी मला आहे. वेगाशी स्पर्धा करणे मला आवडते. मात्र, ती करताना मी कायम स्वत:चे संरक्षण कवच अर्थात तेही सर्व सुरक्षा उपाय करूनच करतो. या दरम्यान एमआरएफने राष्ट्रीय गो-कार्टिंग स्पर्धा भरविली होती. त्यात सहभाग घेत मी पाचवा क्रमांक मिळविला. त्यानंतर मंडोडीसरांनी आणखी सराव करण्यास सांगितला. त्यानुसार मी सराव करत गेलो आणि यश मिळत गेले.प्रश्न : या स्पर्धेनंतर कुठल्या स्पर्धेत यश मिळविले ?उत्तर : सन २००८ ला जे. के. टायर्सची राष्ट्रीय गो-कार्टिंग स्पर्धा झाली. त्यातही मी अव्वल क्रमांक मिळविला. त्यानंतर २०१२-१३चे ज्युनिअर राष्ट्रीय गो-कार्टिंगचे विजेतेपद मिळविले. मलेशिया येथेही चॅम्पियनशीप मिळविली. सन २०१३ मध्ये न्यू ओलीस (अमेरिका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गो-कार्टिंगमध्ये सहभाग घेत अव्वल क्रमांक मिळविला. पुढे मी गो-कार्टिंगसह फॉर्म्युला फोर रेसिंगमध्ये सहभाग घेऊ लागलो. त्यात सन २०१३ जे. के. टायर्सने भरविलेल्या रेसिंगमध्ये फॉर्म्युला बी. एम. डब्ल्यूने मला प्रायोजकत्व दिले. मी सन २०१४ व २०१५ मध्ये पहिल्या तीनमध्ये आलो. प्रश्न : आपल्या कामगिरीची दखल कोणी घेतली ?उत्तर : गेल्या आठ वर्षांपासून मी गो-कार्टिंग स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत आहे. शिवाय गेल्या तीन वर्षांपासून फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये मी चांगली कामगिरी केली आहे. नोएडा येथील बुद्ध सर्किटवर झालेल्या बीएमडब्ल्यू, एफबीओटू आणि एलजीबी फॉर्म्युला फोर या स्पर्धांच्या अंतिम फेरीतील एकूण सहा शर्यतींमध्ये मी फाईव्ह पोडियम पोझिशन पटकाविली. वर्षातील दमदार कामगिरीच्या जोरावर बीएमडब्ल्यू, एफबीओटू प्रकारात विजेतेपदासह तृतीय स्थान पटकाविले. या सर्व कामगिरीची दखल इंग्लंडमधील ख्रिस डिटमन रेसिंग टीमचे प्रमुख ख्रिस डिटमन यांनी घेतली. त्यांनी मला आपल्या टिममध्ये रेसर म्हणून करारबद्ध करत ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर्स क्लबमध्ये संधी दिली. प्रश्न : स्पर्धांची तयारी आणि ध्येय काय आहे?उत्तर : यापुढे होणाऱ्या स्पर्धेकरीता मी कोल्हापुरातील मोहितेज रेसिंगमध्ये १.२ किमी.चे १५० लॅप्स (फेऱ्या) मारतो तर दिल्लीतील आंतरराष्ट्रीय बुद्ध सर्किट ट्रॅकवर मी सराव करतो. हा ट्रॅक ५.७ किमीचा आहे. मला रेसच्या काळात ब्रिटिश रेसिंगचे इंजिनिअर्स मार्गदर्शन करतात. मला यापुढे फॉर्म्युला वन कार रेसिंगमध्ये प्रवेश मिळवायचा आहे. हे माझे ध्येय आहे. मी दररोज सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सराव करतो. त्यानंतर सायंकाळी व्यायाम करतो. प्रश्न : या स्पर्धेत कुठली गाडी आपण वापरणार आहात?उत्तर : मी ब्रिटिश रेसिंगचे प्रतिनिधित्व करताना ट्रॅटस क्रासवर्डचे १४०० सीसीचे इंजिन असलेली परदेशी कार वापरणार आहे. ही जगातील सर्वांत वेगवान कार आहे. यापूर्वी मी बी.एम.डब्ल्यू.ची कार वापरत होतो. ही गाडी १४०० सीसी व ४ सिलिंडरीकल आणि पेट्रोलवर चालणारी कार स्पर्धेसाठी वापरली आहे. प्रश्न : फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये आपला आदर्श कोण आहे ?उत्तर : मला फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये सहभागी व्हायचे आहे. यामध्ये माझा आदर्श विश्वविजयी फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टनचे सहकारी जर्मन ड्रायव्हर निको रॉसबट हे आहेत. यासह मला गो-कार्टिंगमध्ये चित्तेश मंडोडी आयडॉल म्हणूनच माझ्यासमोर आहेत. प्रश्न : या थरारक प्रकारच्या रेसिंगमध्ये कशाला अधिक महत्त्व आहे?उत्तर : फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये प्रवेश घेताना मला माझी शारीरिक तंदुरुस्ती व मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे. याकरीता मी माझे वजनही एकसारखेच ठेवले आहे. जर माझे वजन वाढले तर माझ्या करिअरवर त्याचा परिणाम होईल. एका मायक्रो सेकंदचा फरकही माझे करिअर खराब करू शकते. गो-कार्टिंगच्या लॅप्स मारताना ड्रायव्हर्सचे वजन स्पर्धेनंतर अर्धा किलोने घटते. कारण कार वेगवान चालविताना शरीरातून येणारा घाम अधिक असतो. तर फॉर्म्युला रेसिंगमध्ये ड्रायव्हर्सचे वजन किमान तीन किलोने घटते. प्रश्न : कोणाचे प्रोत्साहन लाभले ?उत्तर : या खेळाचा खर्च अफाट आहे. याकरीता स्पॉन्सरशिप मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मला या खेळाकरीता वडील खासदार धनंजय महाडिक, आई अरुंधती महाडिक, माझे गो-कार्टिंगमधील प्रशिक्षक सचिन मंडोडी, माझे मित्र चित्तेश मंडोडी यांचे वेगवेगळ्या टप्प्यांवर सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळते.- सचिन भोसले