तरुणांचे अपहरण करून दमदाटी

By Admin | Updated: January 21, 2015 00:31 IST2015-01-21T00:25:58+5:302015-01-21T00:31:27+5:30

मुलीची छेड : शिवसेना उपशहर प्रमुखासह चौघांवर गुन्हा

Kidnapping young men | तरुणांचे अपहरण करून दमदाटी

तरुणांचे अपहरण करून दमदाटी

पेठवडगांव : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीचा जाब विचारण्यासाठी दोन भावांचे अपहरण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखासह चारजणांच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात काल, सोमवारी रात्री गुन्हा नोंद झाला.
उपशहर प्रमुख सुनील माने, अक्षय माने यांच्यासह अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. परिसरातील पीडित मुलगी शिक्षणासाठी वडगाव येथील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये येते. तिची छेड अंबपवाडी येथील दोन मुलांनी ३१ डिसेंबरला काढली. त्यावेळी या मुलगीचे नातेवाईक व संबंधित मुले यांच्यात बाचाबाची झाली. याप्रकरणी वडगाव पोलिसांत तक्रार नोंद झाली होती. त्यानंतर ‘ती’ मुले व अक्षय माने यांनी मुलीच्या घरी येऊन दमदाटी केली. यावेळी अक्षय माने यास धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे चिडलेल्या अक्षय माने त्याचा चुलत भाऊ सुनील माने, शहरप्रमुख संदीप पाटील, अंकुश माने व अन्य २५ जणांच्या मदतीने जाब विचारण्यासाठी आला. तंटामुक्त अध्यक्षांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. अक्षय माने व त्याच्या साक्षीदारांनी घराजवळ येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित मुलीच्या नातेवाइकांनी शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पीडित मुलीच्या दोन भावांचे सोमवारी कॉलेजमधून दमदाटीने अपहरण केले. त्यास सुनील माने यांच्याकडे नेले. इतर नातेवाइकांना हजर केल्याशिवाय सोडणार नाही, असा त्यांना दम दिला, पण ‘त्या’ मुलाने पूर्वपरीक्षा असल्यामुळे विनंती करून सुटका करून घेतली. उपनिरीक्षक सचिन मिरधे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kidnapping young men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.