शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘ॲन्टी करप्शन’चे अधिकारी भासवत १० लाखांसाठी डॉक्टरचे अपहरण, तिघांना अटक; 'असे' फुटले बिंग 

By उद्धव गोडसे | Updated: September 4, 2023 17:03 IST

गर्भलिंग निदान होत असल्याची घातली भीती

कोल्हापूर : दवाखान्यात गर्भलिंग निदान होत असल्याचे सांगत कणेरी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे डॉ. सुभाष आण्णाप्पा डाक (वय ५५) यांच्या दवाखान्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बनावट अधिका-यांनी रविवारी (दि. ३) सकाळी छापा टाकला. गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा लाखांची मागणी करून त्यांनी डॉक्टरांचे अपहरण केले. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर त्यांचे बिंग फुटले.सुयोग सुरेश कार्वेकर (वय ३८, रा. इंद्रायनी नगर, मोरेवाडी, ता. करवीर), रवींद्र आबासो पाटील (वय ४२, रा. वाशी, ता. कवीर) आणि सुमित विष्णू घोडके (वय ३३, रा. प्रगतीनगर, पाचगाव, ता. करवीर) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. डाक हे गेल्या २६ वर्षांपासून राजापूर तालुक्यातील कणेरी येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या दवाखान्यासमोर एक कार येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या तिघांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यातील दोघे कोल्हापूरचे, तर एक अधिकारी दिल्लीहून आल्याची बतावणी केली. दवाखान्यात गर्भलिंग निदान होत असल्याची तक्रार आल्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल, असे सांगत त्यांनी जबरदस्तीने डॉक्टरांना कारमध्ये बसवले. गगनबावडा येथे जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. डॉ. डाक यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखवल्याने अपहरणकर्ते त्यांना कोल्हापुरात घेऊन आले. दरम्यान, डॉ. डाक यांनी पत्नी आणि मामेभाऊ डॉ. सुधीर कांबळे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. सायंकाळी सातच्या सुमारास अपहरणकर्ते डॉ. डाक यांना घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाशेजारी असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले.

असा झाला उलगडाअपहरणकर्त्यांच्या पाठोपाठ डॉ. डाक यांचे मामेभाऊ कांबळे, मेहुणे सुरेश कदम हेदेखील प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत ॲड. मीना पाटोळे आणि ॲड. श्रद्धा कुलकर्णी होत्या. त्यांनी अपहरणकर्त्यांची ओळखपत्रे तपासताच तिन्ही संशयित ॲन्टी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया या खासगी संस्थेचे बनावट अधिकारी असल्याचे लक्षात आले. दरम्यान, डॉ. डाक यांनी ११२ नंबरवर फोन करून पोलिसांची मदत मागितली होती. काही वेळातच पोहोचलेल्या शाहूपुरी पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी डॉक्टरचे अपहरण करून खंडणी मागितल्याची कबुली दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस