शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लग्न मोडण्याच्या प्रयत्नातून अपहरण करुन मारहाण, सहा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:20 IST

लग्न ठरलेल्या मुलीसोबतचे वैयक्तिक मॅसेज लग्न मोडल्यानंतर संबंधित मुलीच्या पतीस पाठवल्याचा गैरसमज

पेठवडगाव : लग्न ठरलेल्या मुलीसोबतचे वैयक्तिक मॅसेज लग्न मोडल्यानंतर संबंधित मुलीच्या पतीस पाठवल्याच्या गैरसमजातून एकाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. पोलिसांना तपास करताना त्या मुलीच्या पतीस संदेश पाठवणारा हा तिचा जुना मित्रच असल्याचे उघड झाल्यानंतर नेमका प्रकार उघड झाला. दरम्यान, सोशल मीडियावरून बदनामी, अपहरण व मारहाण प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यातील ६ जणांना अटक झाली असून, त्यांना १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.शामराव तुकाराम मुंदाळे (रा. पेठवडगाव), अनिकेत नामदेव धनवडे (रा. दानोळी, ता.शिरोळ), ओंकार मारुती हेंद्रे ( रा. वनवासाची, ता. कराड, जि. सातारा) यांच्यासह मुलीचा भाऊ, पती अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य संशयित हे कडेगाव,पलूस (जि.सांगली) तालुक्यातील आहेत. अपहरण व मारहाण झाल्याची फिर्याद शुभम संतोष खटावकर (रा. पेठवडगाव) याने पोलिसात दिली. यामध्ये संबंधित मुलीसह तिचा पती, दीर, आई, मामा आदी १२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी, शुभम खटावकर यांचे पलूस येथील एका मुलीबरोबर लग्न होणार होते. मुलगी व तो इन्स्टाग्रामवर बोलत असत. दोघांत परिचय झाल्यानंतर तिने त्यांच्याकडून इन्स्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड घेतला. संबंधित मुलीचा आणखी एक मित्र संपर्कात होता. दरम्यान, संबंधित मुलीने शुभमला विवाहास नकार दिला. २ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर त्यांच्यात व तिच्यात संभाषण होत असल्याचा मेसेज आला. त्याने कल्पना देण्यासाठी मुलीच्या मामाला निरोप देण्याचा प्रयत्न केला.

याबाबत मुलीच्या घरच्यांना सोशल मीडियातील मेसेज दाखवत लग्न मोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कळले. यावरून संतप्त झालेले तिचा भाऊ, मामा, आई, मित्र यांनी शुभम यांचे वडगाव येथून अपहरण करून कडेगाव येथे आणले. येथे त्याचा मोबाइल काढून मारहाण केली. तसेच जबरदस्तीने स्टॅम्प लिहून घेतला. यावेळी संबंधित मुलगी, तिचा पती, दीराने त्याला मारहाण केली.याबाबत पोलिसांकडे खटावकर पोलिसात तक्रार दिल्यानंतर सायबर सेलच्या मदतीने पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तपास केला. मेसेज टाकणाऱ्याला शोधून काढला. त्यानंतर सहा संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल एम पठाण यांच्या समोर उभे केले असता,तेरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत.

दोघांत तिसरा, मैत्री विसरासंबंधित मुलीचा विवाह मोडण्यासाठी फिर्यादीचा इन्स्टाग्रामचा वापर करून त्यांचे व तिचे संभाषण (चॅट) नियोजित वरास टाकण्यात आले होते. मुलीची बदनामी करून तिचे लग्न मोडत शुभमला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा डाव अनिकेत धनवडे याने रचला होता. मात्र पोलिसांनी तो उघडकीस आणला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस