शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खोची बालिका खून प्रकरण: क्रौर्यापुढे वडिलकीचे नातेही थिजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:19 IST

काका हे नातं वडिलांसमान असतं, पण खोचीतील (ता. हातकणंगले) बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे केलेली हत्या ही या नात्याला कलंक लावणारी घटना ठरली अन् नातं कौर्यापुढे थिजलं.

तानाजी पोवारकोल्हापूर : काका हे नातं वडिलांसमान असतं, पण खोचीतील (ता. हातकणंगले) बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे केलेली हत्या ही या नात्याला कलंक लावणारी घटना ठरली अन् नातं क्रौर्यापुढे थिजलं. दि. ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच न्यायालयाच्या अवघ्या १२ कामकाजांमध्ये आरोपीविरुद्धचा खटला पूर्ण होऊन त्याला शिक्षेला सामोरे जावे लागले.आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवार याची त्याच गावातील बालिकेच्या वडिलांशी मैत्री होती, त्याची त्यांच्या घरी ये-जा होती. बालिका त्याला काका म्हणायची. दि. ३१ ऑक्टोबर २०२१ला याच काकाने तिचा घात केला. सकाळी आरोपी खेळण्याचे निमित्त काढून तिला घरातून घेऊन गेला. तासभर गावातील भैरवनाथ मार्गावर टेहाळणी केली. गावातील चार महिलांनी त्याच्यासोबत बालिकेला अखेरचे पाहिले. दुपारी १२.४५ वाजता तो गोंधळलेल्या अवस्थेत जाताना एका साक्षीदाराला दिसला. त्यानंतर तो घरी जाऊन निवांतपणे झोपला.

दुपारी बालिका घरी नसल्याने शोधाशोध केली. तरुणांनी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी चौकशी करताना चौघा साक्षीदारांनी आरोपीसोबत बालिकेला पाहिल्याचे सांगितले. बालिकेच्या आईने आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली, त्यावेळी आरोपीने माहिती नसल्याबाबत कानावर हात ठेवले. सायंकाळी ५ वाजता बालिकेचा मृतदेह निर्जनस्थळी मिळाला. तिच्या नाकातोंडातून रक्त येत होते, मानेवर व गुडघ्यावर खरचटलेल्या जखमा होत्या. पोलीसही घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. तेथे केस, माती, गुटख्याची पाकिटे मिळाली, ती पोलिसांनी ताब्यात घेतली. मृतदेह सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर बालिकेवर लैंगिक अत्याचार व खून झाल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी संशयावरून दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी बंडू पोवारला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत घरातील माळ्यावर लपवलेले घटनेवेळचे कपडे काढून दिले. त्यापैकी जीन्स पॅंटवर घटनास्थळाची माती तर टी-शर्टवर रक्ताचे डाग आढळले. चपलांना लागलेली माती व पाला हा घटनास्थळाचा तसेच रक्ताचे डाग बालिकेचे व केस हे त्याचेच असल्याचे फॉरेन्सिक लॅबमध्ये स्पष्ट झाले. याचा तपास करून अवघ्या महिनाभरात वडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संतोष घोळवे यांनी आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केेले. त्यानुसार खटला चालून सोमवारी निकाल दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी