शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अवजारे खरेदीत शेतकऱ्यांच्या पसंतीला ‘खो’

By admin | Updated: October 13, 2015 23:57 IST

कृषी विभागाचे निर्देश : अनुदानावर मिळणारी अवजारे महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाकडून खरेदी करा

प्रकाश पाटील- कोपार्डे---शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करण्याची तरतूद केंद्राने केली होती. मात्र, याचवर्षी दोन महिन्यांपूर्वी केंद्राने दिलेल्या निर्देशाला फाटा देऊन राज्य कृषी विभागाने अवजारे खरेदीची सुधारित पद्धत राबविण्यासंदर्भात नवीन निर्देश जाहीर केले असून, शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडूनच अवजारे खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या राज्य शासनाच्या निर्णयाने प्रचलित पद्धतीत सुधारणा करून या योजनेतील भ्रष्टाचार दूर करण्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अवजारांसाठीच्या प्रचलित पद्धतीत बदल करून सुधारित पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी विभागाला दिले होते. त्यामध्ये अवजारांचे अनुदान थेट ‘लाभार्थी’ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आणि शेतकऱ्यांना आपल्या पसंतीच्या कंपनींची अवजारे खुल्या बाजारातून खरेदी करण्याची मुभा देणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश होता. राज्य कृषी विभागाने त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनाही केल्या होत्या. मात्र, याला फाटा देत मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे. त्याबाबतचा सुधारित तपशील व प्रपत्र असलेल्या नवीन मार्गदर्शन सूचना राज्याचे कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक के. व्ही. देशमुख यांच्या सहीने नुकत्याच जारी करण्यात आल्या आहेत. कृषी आयुक्तांनी आढावा सभेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी अवजारांची खरेदी ही ‘महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ’ यांच्यामार्फतच करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशांमध्ये अंशत: बदल करण्यात आले आहेत, असे या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर अनुदान जमा करण्याच्या बाबतीत मात्र बदल झालेला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना प्रमाणित अवजारे मिळावीत, याच हेतूने हा अंशत: बदल करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत असला तरी या निर्णयामागे पुरवठादारांची लॉबी व कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतल्याचे सांगण्यात येते. राज्यात निविष्ठा आणि अवजारे वाटपाची प्रचलित पद्धत गैरव्यवहारांना पोषक असून, त्यामुळे निकृष्ट दर्जाची उत्पादने मिळतात. त्याचबरोबर वेळेवर पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. सध्याच्या सदोष पद्धतीत बदल करून निविष्ठा व अवजारे खरेदीचे ‘गुजरात मॉडेल’ राबवावे, अशी मागणी होत आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात अजून ठोस पावले उचलली नसताना केंद्राच्या दबावामुळे किमान केंद्राच्या ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान’ या एका योजनेसाठी तरी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा लागला होता. मात्र, राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून अवजारे निवडण्याचे आणि खरेदी करण्याचे स्वातंत्र हिरावून घेत त्यातही खोडा घातला आहे. निविष्ठा व अवजारे खरेदीसाठी गुजरात मॉडेल अशी मागणी.लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर अनुदान जमा करण्याच्या बाबतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यात निविष्ठा आणि अवजारे वाटपाची प्रचलित पद्धत गैरव्यवहारांना पोषक असून, त्यामुळे निकृष्ट दर्जाची उत्पादने. सध्याच्या पद्धतीत शेतकऱ्यांना आपल्या पसंतीची उत्पादने निवडण्याचे स्वातंत्र्य नाही.