खानविलकर पंपासमोरील ड्रेनेजचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:21 PM2019-08-24T12:21:04+5:302019-08-24T12:24:51+5:30

कसबा बावडा रस्त्यावर खानविलकर पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईनच्या कामात तांत्रिक तसेच आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. काम करताना येणाऱ्या अडचणींमुळे कामाची गती अगदीच संथ असून, आर्थिक अडचणी सोडविण्याचा प्रशासनाने शब्द दिला तरच कामाची गती वाढणार आहे. काम पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबाचा मात्र परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार हे सांगणे अवघड बनले आहे.

Khanwilkar stopped drainage work at the pump | खानविलकर पंपासमोरील ड्रेनेजचे काम रखडले

 कोल्हापूर शहरातील खानविलकर बंगला ते चिपडे सराफ दुकानादरम्यान ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे. तांत्रिक तसेच आर्थिक कारणांनी हे काम रखडले असून, या कामामुळे एक जुनी लाईनही तुटली आहे./ छाया : नसीर अत्तार

Next
ठळक मुद्देखानविलकर पंपासमोरील ड्रेनेजचे काम रखडलेपरिसरातील नागरिक त्रस्त : तांत्रिक, आर्थिक अडचणींचा डोंगर

कोल्हापूर : कसबा बावडा रस्त्यावर खानविलकर पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईनच्या कामात तांत्रिक तसेच आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. काम करताना येणाऱ्या अडचणींमुळे कामाची गती अगदीच संथ असून, आर्थिक अडचणी सोडविण्याचा प्रशासनाने शब्द दिला तरच कामाची गती वाढणार आहे.

काम पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबाचा मात्र परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार हे सांगणे अवघड बनले आहे.

नागाळा पार्क ते चिपडे सराफ दुकान या मार्गावर ४०-४५ वर्षांपूर्वी एक ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली आहे. ड्रेनेज लाईनच्या वरील भागात काही अपार्टमेंट तसेच बंगले उभे राहिले आहेत. ड्रेनेज लाईन तुंबली असून, ती दुरुस्त करणे अथवा त्यातील गाळ बाहेर काढणे, त्यावरील इमारतींमुळे मोठे अडचणीचे आहे. त्यामुळे ही ड्रेनेज लाईन तेथून वळविण्यात येत असून पुढे खानविलकर बंगल्यासमोर जोडली जाणार आहे.

 

Web Title: Khanwilkar stopped drainage work at the pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.