शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

खंडेरायासाठी तो चालत निघाला सोलापूरच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:31 IST

सात महिन्यांचे बाळ असताना बायको बाळाला सोडून गेली. काही कामधंदा नाही. या विवंचनेत सापडलेल्या बापाने चालत जाण्याचा निश्चय केला आणि गोव्याहून मुलगा खंडेरायाला पोटाशी घेऊन सोलापूरच्या दिशेने तो चालू लागला.

ठळक मुद्देगोव्याहून १५० किलोमीटर पायपीट बाळाला पोटाशी घेऊन जाणाऱ्या बापाची कहाणी

कृष्णा सावंत पेरणोली (ता. आजरा) : सात महिन्यांचे बाळ असताना बायको बाळाला सोडून गेली. काही कामधंदा नाही. या विवंचनेत सापडलेल्या बापाने चालत जाण्याचा निश्चय केला आणि गोव्याहून मुलगा खंडेरायाला पोटाशी घेऊन सोलापूरच्या दिशेने तो चालू लागला. हणमंत बाबूराव डोंबाळे (वय ३५, रा म्हालसवडे, ता. माळशिरस) याची ही कहाणी. आजऱ्यातील पोलीस व शिक्षकांच्या माणुसकीचे दर्शन त्यांच्या मदतीतून घडले.कोरोनाच्या संकटाचे चटके मोलमजुरी करणाऱ्यांना कसे बसत आहेत, हे बाळाला पोटाशी घेऊन चालत जाणाऱ्या बापाच्या परिस्थितीवरून स्पष्ट होते. हणमंत हे गोव्यात मजुरी करून कुटुंबाची गुजराण करीत होते. संसर्ग वाढल्यावर कामधंदा बंद झाला आणि त्याचा हणमंतच्या जगण्यावर परिणाम झाला. त्यामुळे त्याने मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला.

बाळासह आपल्यालाही बायको सोडून गेल्याने हणमंत यांच्या विवंचनेत भर पडली. गावाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ४ आॅगस्टपासून आंबोली-आजऱ्याच्या दिशेने त्यांनी चालायला सुरुवात केली. वादळ, वारे, मुसळधार पावसातून मिळेल ते खात १५० किलोमीटर चालत गवसे (ता. आजरा) येथे तो पोहोचला. चेक पोस्ट नाक्याशेजारी भुकेने व्याकुळ झालेला व बाळाला घेऊन बसलेला हणमंत पोलीस कॉन्स्टेबल सचिन वायदंडे यांना दिसला. त्यांनी विचारपूस करून त्याला जेवणाचा डबा दिला. खंडेरायाला दूध दिले.

शिक्षक असलेल्या आनंदा पेंडसे, अनिल बोलके, जानबा पोवार, मारुती पाटील यांनी त्यांना आर्थिक मदत केली. इचलकरंजीकडे निघालेल्या खासगी वाहनात बसवून त्यांना पाठविण्यात आले. तेथून रविवारी त्यांचा पुढचा पायी प्रवास सोलापूरच्या दिशेने सुरू झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरgoaगोवाSolapurसोलापूर