शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Kerala Floods : देवभूमी केरळसाठी कोल्हापूरकरांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 17:56 IST

केरळ बांधवासाठी मदतीसाठी कोल्हापूरकारांच्यावतीने सिध्दीगिरी मठ, व्हाईट आर्मीचे जवान यांच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात आली,अशी माहिती रेस्क्यू अ‍ॅन्ड रिलीफ चिफ उज्वल नागेशकर व व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देदेवभूमी केरळसाठी कोल्हापूरकरांचा मदतीचा हातएक लाख साड्या व २२ लाखांची औषधांचे वाटप

कोल्हापूर : केरळ राज्यावर १६ आॅगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने ४४ हून अधिक नद्यांच्या पाणी अनेक गावात व शहरात घुसले. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन अनेकजण बेघर झाले.

येथील बांधवासाठी मदतीसाठी कोल्हापूरकारांच्यावतीने सिध्दीगिरी मठ, व्हाईट आर्मीचे जवान यांच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात आली,अशी माहिती रेस्क्यू अ‍ॅन्ड रिलीफ चिफ उज्वल नागेशकर व व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नागेशकर म्हणाले, केरळ येथील अपत्तीवर मात करण्यासाठी कोल्हापूरातील सर्व बांधवानी, सामाजिक संस्थानी वेगवेगळ््या स्वरुपात मदती दिली. यामध्ये अन्नधान्य कपडे, ब्लॅकेट, औषधे, भांडी, जणावरांचे पेंड, चारा आदी मदतीसह ट्रक्स व अ‍ॅम्बुलन्स सेवा देण्यात आली.

यासह एक लाख साडी व २७ लाखांची औषधे आमच्याकडे जमा झाली होती. या सर्व वस्तूंचे योग्य प्रकारे नियोजन करून केरळ येथील ज्या ठिकाणी कमी प्रमाणात मदत पोहचली होती. त्या ठिकाणी पोहचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो.अशोक रोकडे म्हणाले, पहिली रेस्क्यू टिम १८आॅगस्टला कोल्हापूरातून रवाना झाली. १९ आॅगस्टला आलप्पी जिल्हयातील कायमकुलम या शहरात रेस्क्यू अ‍ॅन्ड रिलीफ चीफ उज्वल नागेश्करांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसाठी तात्काळ औषधोपचाराची व रिलीफ सेंटरला सुरुवात करण्यात आली.

वैद्यकीय पथकापासून अनेक स्वयंसेवक येथून त्या मदत कार्यामध्ये सहभागी होत होते. गरजेप्रमाणे औधषेअन्नधान्य, कपडे,पुस्तके, जीवनापयोगी वस्तू पुरविल्या जात होत्या.या उपक्रमात १०० हून अधिक स्वयंसेवकांची टीम यामध्ये १५ डॉक्टरांची टिम, प्रत्यक्ष आपत्तीग्रस्त गावात जावून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत होते. अ‍ॅम्ब्यूलन्स, ट्रक, मोठे डंपर अशी दहा वहाने २५० कि.मी परिघात वेगवेगळ््या स्वरुपात कार्यरत होती. यामध्ये घरांची - देवळांची स्वच्छता बचावकार्य, मदतकार्य, वैद्यकीय सुविधा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक पारस ओसवाल, व्हाईट आर्मीचे जवान उपस्थित होते. 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरkolhapurकोल्हापूर