शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

मसाई पठारावर रंगीबेरंगी नैसर्गिक रानफुलांची मुक्त ऊधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 2:21 PM

कोल्हापुर पासुन ३५ कि.मि.वर असणाऱ्या मसाई पठारावर सध्या रानफुलांचा हंगाम सुरु असुन विवीध नैसर्गिक फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधुन घेत आहेत. मसाई पठारावर रंगीबेरंगी रान फुलांची मुक्त ऊधळण सुरु असुन निसर्गनिर्मीत सप्तरंगाचा हा उत्सव पाहाण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची मसाई पठारावर गर्दी होवु लागली आहे. 

ठळक मुद्देमसाई पठारावर नैसर्गिक फुलांचा अनमोल ठेवा        पर्यटक व अभ्यासकांची मसाई पठारावर लक्ष

नितीन भगवान    पन्हाळा - मसाई पठारावर रंगीबेरंगी रान फुलांची मुक्त ऊधळण सुरु झाली असुन निसर्गनिर्मीत सप्तरंगाचा हा उत्सव पाहाण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची मसाई पठारावर गर्दी होवु लागली आहे. मसाई पठारावर सध्या रानफुलांचा हंगाम सुरु असुन विवीध नैसर्गिक फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधुन घेत आहेत विस्तीर्ण अशा हिरव्या गवताच्या गालीच्यावर फुललेली सफेद मुसळी ( क्लोरोफायटम), सोनकी (सेनीसीओ), केना (कमेलोना), कापरु (बिओनीआ), मंजीरी (पोगोस्टीमोन डेक्कननेन्सीन), निलवंती ( सायनोटीस), सितेची आसव (युट्रीक्युलेरीया), सफेद गोंद (इरिओकोलास), निलीमा (ॲनीलीमा), कंदीलफुल (सिरोपोनीया), दिपकाडी (डिपकडी), या शिवाय रान कोथींबीर, रानहळद, जंगली सुरण, तेरडा या औषधी वनस्पती पहावयास मिळतात.   मसाई पठारवर वर जाताना अग्निशीखा अर्थात कळलावीची फुले व शतावरीचे वेल या औषधी वेलीं पहावयास मिळतात पठारावर एकाच जातीच्या पण यात विवीध प्रकार असलेल्या फुलांपैकी स्मीथीया म्हणजे पिवळी फुले याच्या पठारावर उगवणाऱ्या नऊ जाती आहेत. या सर्वच जाती मसाई पठारावर ऊगवतात.

यातील सर्वात मोठे फुल ऊगवणाऱ्या वनस्पतीवरील पिवळ्या फुलावरील पाकळीवर दोन लहान तांबडे ठिपके असतात. यालाच मिकीमाऊसची फुले असे म्हणाले जाते. समुहाने वाढणारी ही फुले या ठिकाणच्या पाणथळ परीसरात आहेत. यात प्रामुख्याने सफेद मुसळी, निळीची राइत, भुई आमरी (ग्राउंडआर्केड) काळीमुसळी (कुरकीलगो), सफेदगेंद ही तर चेंडुच्या आकाराची लहान फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधुनच घेतात. याच्या पण दहा जाती आहेत. यातील पठारावर गोलगेंद, तारागेंद, पानगेंद या जाती प्रामुख्याने दिसतात.    कोल्हापुर पासुन ३५ कि.मि.वर असणारे मसाई पठार त्याच्या पायथ्थाशी असणाऱ्या ॲडव्हेंचर पार्क मुळे पर्यटकांचे लक्ष वेधुन घेवु लागले आहे. जैव विवीधतेने नटलेल्या या ऐतिहासिक, पौराणीक, व खगोलअभ्यासकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या महतीबरोबरच नैसर्गिक फुलांमुळे वेगळी ओळख निर्माण होवु लागली आहे.       निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष  मधुकर बाचुळकर म्हणाले की, उत्तर पश्चीम घाटातील बहुतेक पठारावर नैसर्गिक फुलांचा हंगाम पावसाळ्यानंतर तीन महीने पहावयास मिळतो. पण मसाई पठारावरील बेसाल्ट ट्राईट खडक हा पाऊस, वारा यांच्या मुळे झिज पावुन त्यावर हलक्या प्रमाणात मातीचा थर निर्माण होतो. यावर ही नैसर्गिक फुलांची बाग तयार होते या बेसाल्टच्या खडकाकडे मानवाचे लक्ष गेल्याने यातील खनीजे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु झाले आहे, या कडे आपण सर्वांनीच वेळीच लक्ष दिले तर ही जैवविवीधता पुढच्या अनेक पिढ्या ही नैसर्गिफुलांचि बाग अनुभवत राहतील.          

टॅग्स :kolhapurकोल्हापूर