शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक निकाल! पाकिस्ताननंतर आणखी एक तगडा संघ हरला, कॅनडाने विजय मिळवला 
2
...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी
3
नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या
4
फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले... 
5
आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न
6
T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी
7
इस्रायलचा मध्य गाझामध्ये हवाईहल्ला; ४० पॅलेस्टाइन नागरिक ठार, १८ लहान मुलांचा समावेश
8
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
9
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी
10
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
11
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
12
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
13
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
14
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
15
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
16
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
17
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
18
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
19
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
20
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली

कोल्हापूरला अर्थसंकल्पात ठेंगाच; पर्यटनस्थळ विकास, हेरिटेज संवर्धनाकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:49 AM

कोल्हापूर : कोल्हापूर -सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी ३२०० कोटींचा प्रकल्प जागतिक बँकेच्या साहाय्याने ...

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी ३२०० कोटींचा प्रकल्प जागतिक बँकेच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. तो प्रत्यक्षात येण्यासाठी किती पिढ्या जातील हे सांगता येत नाही. त्याची आता फक्त पाहणी झाली आहे. त्यासाठी राज्य शासनाने काही रक्कम द्यावयाची आहे; परंतु त्याचीही तरतूद राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पातून केल्याचे दिसत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभर विद्यार्थी क्षमतेचे परिचर्या प्रशिक्षण केंद्राची घोषणा चार दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी चौदाशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमातून दिले होते. त्या प्रकल्पाचे शासनाकडे सादरीकरणही झाले आहे. अंबाबाई मंदिर विकास तीर्थक्षेत्र कॉरिडॉर करण्यासाठी निधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. यापूर्वी जाहीर झालेल्या निधीतूनच काही कामे सुरू आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अंबाबाई मंदिरासाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले असले तरी त्याचा समावेश अर्थसंकल्पात झालेला नाही.

एकवीरा देवी व माहुरगडची रेणुका देवी या देवस्थानच्या विकासासाठी राज्य सरकारने तेथे विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला, मात्र कोल्हापूरची अंबाबाई याच शक्तिपीठांपैकी एक असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याकरिताही निधी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. माजी पालकमंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूरचा पर्यटन विकास जयपूरच्या धर्तीवर करणार असल्याचे सांगत होते. परंतु अशा कोणत्याही कामांसाठी या अर्थसंकल्पात एक रुपयांची तरतूद केलेली नाही.

पंचगंगा प्रदूषणाकडे दुर्लक्षकोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरनियंत्रणासाठी करायच्या उपाययोजनांची चर्चा जोरात असली तरी मूळ पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्याकरिता काही निधी मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु तेथेही निराशा झाली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य जनतेची निराशा केली आहे. बेरोजगारी, महागाई कमी करण्यासाठी तसेच मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही. घोषणा एक रुपयाची आणि दहा पैसेही द्यायला नाहीत, अशी सरकारची अवस्था झाली आहे. - आमदार सतेज पाटील 

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक साहाय्यित ३ हजार २०० कोटी रुपये किमतीचा प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय, चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र आदींमुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे. - राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBudgetअर्थसंकल्प 2024Ajit Pawarअजित पवारtourismपर्यटन