केदार साळुंखेचा ‘स्टार रिपब्लिक पुरस्कारा’ने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST2021-02-05T07:12:39+5:302021-02-05T07:12:39+5:30
डाॅ. केदार याला उत्तर प्रदेशातील बुक ऑफ रेकाॅर्डतर्फे दिला जाणारा ‘इंटरनॅशनल आयकाॅन २०२१’ व स्टार बुक ऑफ रेकाॅर्डतर्फे दिला ...

केदार साळुंखेचा ‘स्टार रिपब्लिक पुरस्कारा’ने गौरव
डाॅ. केदार याला उत्तर प्रदेशातील बुक ऑफ रेकाॅर्डतर्फे दिला जाणारा ‘इंटरनॅशनल आयकाॅन २०२१’ व स्टार बुक ऑफ रेकाॅर्डतर्फे दिला जाणारा ‘स्टार रिपब्लिक २०२१’ असे दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अवघ्या सातव्या वर्षी सायकलिंगमध्ये एकाच बुकामध्ये एकावेळी चार विक्रम नोंदविणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत चौदा विश्वविक्रमांची नोंद आहे. तमिळनाडूतील ‘द दायसेस ऑफ आशिया’ या नामांकित संस्थेने त्याच्या कार्याची दखल घेत त्याला वयाच्या सातव्या वर्षी ॲथलेटिक्समधील ‘डाॅक्टरेट इन ॲथलेटिक्स’ ही पदवी देऊन सन्मानित केले आहे. त्याला विबग्योरच्या प्राचार्या स्नेहल नार्वेकर, प्रशिक्षक सचिन इंगवले, स्वप्निल कोळी, वडील विजय साळुंखे, आई स्वाती गायकवाड-साळुंखे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
फोटो : ०३०२२०२१-कोल-केदार साळुंखे