kdcc bank election : २१ जागांसाठी तब्बल २७५ जण इच्छुक, 'या' गटात सर्वाधिक अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 12:56 PM2021-12-04T12:56:05+5:302021-12-04T12:56:51+5:30

सोमवारी (दि. ६) छाननी होत असून २१ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अनेक दिग्गज नेतेमंडळीनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीकडे जिल्हावासियांचे लक्ष

kdcc bank election 275 candidates for 21 seats | kdcc bank election : २१ जागांसाठी तब्बल २७५ जण इच्छुक, 'या' गटात सर्वाधिक अर्ज

kdcc bank election : २१ जागांसाठी तब्बल २७५ जण इच्छुक, 'या' गटात सर्वाधिक अर्ज

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून २१ जागांसाठी तब्बल २७५ जणांनी ३६६ अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी अखेरच्या दिवशी विद्यमान संचालक अशोक चराटी, क्रांतीसिंह पवार -पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, संग्रामसिंह नलवडे, राहुल देसाई, गोपाळराव पाटील, अनुराधा बाबासाहेब पाटील, अशोकराव खोत यांनी विविध गटातून अर्ज भरले. सोमवारी (दि. ६) छाननी होत असून २१ डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे.

जिल्हा बँकेसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सोमवार ते गुरूवार या चार दिवसात १९७ जणांनी २७४ अर्ज दाखल केले होते. शुक्रवार शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांनी गर्दी केली होती. दिवसभरात ७५ जणांनी ९३ अर्ज दाखल केले. एकूण २१ जागांसाठी २७५ जणांनी ३६८ अर्ज भरले. शुक्रवारी अशोक चराटी यांनी समर्थकांसह अर्ज भरले. यावेळी जयवंत शिंपी, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोसकर, नामदेव नार्वेकर, विजयकुमार पाटील उपस्थित होते.

क्रांतीसिंह पवार यांनी दूध संस्था गटातून अर्ज भरला. यावेळी अशोकराव पवार, बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, एकनाथ पाटील, अमित कांबळे आदी उपस्थित होते. संग्रामसिंह नलवडे यांनी ‘गडहिंग्लज ’ विकास संस्था, अनिल पाटील ‘ करवीर ’ विकास संस्था, रमेश वारके ‘ राधानगरी ’ विकास संस्था गटातून अर्ज भरले. मदन कारंडे यांनी प्रक्रिया गटातून अर्ज भरला. आमदार पी. एन. पाटील यांचे समर्थक शेतकरी संघाचे माजी संचालक अशोकराव खोत यांनी भटक्या विमुक्त जाती अर्ज भरला. यावेळी आप्पासाहेब माने, सत्यजीत पाटील, महादेव पाटील, अरुण खोत, बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते. अजित पाटील-परितेकर व राहुल देसाई यांनी पतसंस्था, गोपाळराव पाटील यांनी दूध संस्था गटातून अर्ज भरले आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी महादेव गौड, संजय जाधव व सुरेश कामरे यांचे अर्ज दाखल केले.

बँकेच्या २१ जागांसाठी २७५ जणांनी ३६६ अर्ज दाखल केले असून त्याची छाननी सोमवारी सकाळी अकरा वाजता होत आहे. ७ ते २१ डिसेंबर पर्यंत माघारीची मुदत असून ५ जानेवारी रोजी मतदान होत आहेत.

समर्थक नजर ठेवून

अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने विशेषता विकास संस्था गटातून आपल्या तालुक्यातून कोण अर्ज दाखल करतो. यावर उमेदवारांचे समर्थक बँक आवारात एकूण हालचालीवर नजर ठेवून होते.

इतर मागासवर्गीय गटात सर्वाधिक अर्ज

सर्वच गटात इर्षेने अर्ज दाखल झाले आहेत. त्यातही सर्वाधिक अर्ज इतर मागासवर्गीय गटात दाखल झाले. एका जागेसाठी तब्बल ४९ जण इच्छुक आहेत. त्या पाठोपाठ पतसंस्था व बँक गटात ४४, महिला गटातून ४२, दूध संस्था गटात ३९ अर्ज दाखल झाले आहेत.

असे झाले गटनिहाय अर्ज -

विकास संस्था :

शिरोळ - १३

शाहूवाडी -८

राधानगरी - ८

पन्हाळा - १२

कागल - ९

करवीर - ११

हातकणंगले - ९

गगनबावडा - ४

गडहिंग्लज - १४

चंदगड - ७

भुदरगड - १७

आजरा - ७.

Web Title: kdcc bank election 275 candidates for 21 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.