काटेभोगाव तलावाच्या दुरुस्तीचे काम नव्याने करणार,जलसंधारण मंत्र्यांची माहिती : पी.एन.पाटील यांचा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:33+5:302021-03-06T04:22:33+5:30
कोल्हापूर : काटेभोगाव (ता. पन्हाळा ) येथील पाझर तलावाच्या दगडी पिचिंगचे काम नव्याने करून घेण्यात येणार असल्याची माहिती ...

काटेभोगाव तलावाच्या दुरुस्तीचे काम नव्याने करणार,जलसंधारण मंत्र्यांची माहिती : पी.एन.पाटील यांचा पाठपुरावा
कोल्हापूर : काटेभोगाव (ता. पन्हाळा ) येथील पाझर तलावाच्या दगडी पिचिंगचे काम नव्याने करून घेण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली. करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मौजे काटेभोगाव गावापासून नदीचे पात्र दूर अंतरावर आहे. यामुळे सिंचनाअभावी सर्वाधिक कोरडवाहू शेती आहे .पावसाळा संपल्यानंतर रब्बी पिके व जनावरांना पाण्याची सोय असावी म्हणून १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेतून गावाच्या दक्षिणेला पाझर तलाव बांधण्यात आला. पण या तलावाला मोठी गळती असल्याने त्याच्यात पाणी साठवण होत नव्हती . हा तलाव मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग केल्याने डागडुजीसाठी ५६ लाख ६७ हजार निधी मंजूर करण्यात आला . यानंतर भरावावरील झाडे काढून साफसफाई करण्यात आली व पाया खोदाई करून कामाला सुरुवात करण्यात आली होती .तलावाचे दगडी पिचिंग व मुरूम जूनमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तलावात घसरुन गेला. त्यामध्ये शासनाच्या निधीचा कोणताही अपव्यय झालेला नसून अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे ही घटना घडली आहे. सद्यस्थितीत धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यामुळे काम थांबले आहे. निविदेमधील काम अद्याप पूर्ण झालेले नाही.त्यामुळे तलावातील पाणी कमी झाल्यावर घसरलेला मुरूम व दगड काढून नव्याने दगडी पिचिंगचे काम चांगल्या प्रकारे करून घेण्यात येईल असे मंत्री गडाख यांनी सभागृहाला सांगितले.