रूपांतरित कर भरण्यावरून शिवसेनेकडून करवीर प्रांताधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:11 IST2021-03-01T21:09:57+5:302021-03-01T21:11:24+5:30
Shiv sena koalhapur- व्यापाऱ्यांना रूपांतरित कराच्या भरणा करण्यापोटी पाठवलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा देत सोमवारी शिवसेनेने करवीर प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांना धारेवर धरले. सक्ती नसल्याचा खुलासा दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. या आक्रमक आंदोलनामुळे काहीकाळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोमवारी करवीर प्रांत कार्यालयात रूपांतरित कराच्या नोटिसीविरोधात आंदोलन केले. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर : व्यापाऱ्यांना रूपांतरित कराच्या भरणा करण्यापोटी पाठवलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा देत सोमवारी शिवसेनेने करवीर प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांना धारेवर धरले. सक्ती नसल्याचा खुलासा दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. या आक्रमक आंदोलनामुळे काहीकाळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कोल्हापूर शहरातील १७ हजार व्यापाऱ्यांना करवीर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून रूपांतरित कर भरणा करा, अन्यथा ४० पट दंडाच्या शिक्षेला तयार राहा, अशा नोटिसा पाठविल्या आहेत. यावरून व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
यावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामागील करवीर प्रांत कार्यालयात जाऊन आंदोलन केले.
यावेळी व्यापारी महापालिकेच्या घरफाळ्यासह अन्य करही नियमितपणे भरणा करत असल्याचे निदर्शनास आणून देताना पवार यांनी प्रांताधिकारी नावाडकर यांना दरवर्षी रूपांतरित कराचे भूत व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर का बसवता अशी विचारणा केली.
या आंदोलनात शिवसेनेचे हर्षल सुर्वे, संजय जाधव, सुजित चव्हाण, राजेंद्र पाटील, राजू जाधव, शशी बिडकर, प्रदीप हांडे, तानाजी आंग्रे, संदीप घाटगे यांनी सहभाग घेतला.