शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड-इचलकरंजी-बेळगाव रेल्वेमार्ग करा

By admin | Updated: September 6, 2016 23:43 IST

मंगलादेवी शिंदे : पंतप्रधानांसह रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी

आष्टा : पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील औद्योगिक विकासासाठी कऱ्हाड-इचलकरंजी-निपाणी-बेळगाव या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आष्ट्याच्या नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कऱ्हाड - इचलकरंजी - निपाणी- बेळगाव या रेल्वेमार्गाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सुमारे १९१ किलोमीटर अंतर असून, २१०० कोटी रुपये खर्चाचा हा रेल्वेमार्ग आहे. या मार्गावरील कऱ्हाड, शेणोली, तांबवे, इस्लामपूर, वाळवा, आष्टा, दुधगाव, नेज, हातकणंगले, इचलकरंजी, हुपरी, कागल, आडी, निपाणी, कणंगला, संकेश्वर, हलकर्णी, हंडीगणूर, काकती, सांबरे व बेळगाव या गावातील विकासाला चालना मिळणार आहे. या मार्गावरील अनेक गावे कृषी, औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहेत. येथील उत्पादित मालाला बाजारपेठ मिळण्यास या मार्गामुळे मदत होणार आहे. ग्रामीण भागातील शेतमाल शहराकडे नेण्यास जवळचा मार्ग उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम, पैसा वाचण्यास मदत होणार आहे. नवीन रेल्वेमार्गाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मार्गाच्या सर्व्हेचे काम नुकतेच पूर्ण झाले असल्याने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील अनेक गावे जवळ येणार आहेत. त्यामुळे डिझेलची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. कऱ्हाड व बेळगाव जंक्शनमुळे विकासाला गती मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेची विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले आहे. येत्या अर्थसंकल्पात तातडीने मंजुरी देऊन या मार्गाचे काम लवकर सुरु करण्याची मागणी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (वार्ताहर)१९१ किलोमीटरच्या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण कऱ्हाड-इचलकरंजी-बेळगाव या १९१ किलोमीटरच्या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण. खर्च सुमारे २१०० कोटी. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून जवळ असणाऱ्या या रेल्वे मार्गामुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार.