शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

गगनबावड्यातील निसर्ग संपदेला वृक्षतोडीचा शाप विकासाच्या नावाखाली कत्तल : पर्यावरण समतोल ढासळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:23 IST

साळवण : निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यातील निसर्ग संपदेला विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीचा शाप लागला असून अनेक जैवविविधतेने संपन्न असणारी ठिकाणे एकतर नष्ट झाली आहेत अथवा नष्ट होण्याच्या मार्गावर

साळवण : निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यातील निसर्ग संपदेला विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीचा शाप लागला असून अनेक जैवविविधतेने संपन्न असणारी ठिकाणे एकतर नष्ट झाली आहेत अथवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरण ºहासामुळे निसर्गातील अनेक अन्नसाखळीतील दुवे निखळल्यामुळे अनेक अन्नसाखळ्या कमकुवत होऊन मौल्यवान वनस्पती व प्राणी नष्ट होऊन पर्यावरण ढासळत चालले आहे. तर जंगलतोड करून सपाटीकाण केल्यामुळे मुळचे जंगलातील पाणवठेच नष्ट झाल्याने वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे.

एकीकडे शतकोटी वृक्ष लागवट , झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा जीवन वाचवा, जल आहे तर कल आहे. अशा अनेकविध कार्यक्रमांवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते आहे. तर दुसरीकडे घनदाट जंगलावर बेदरकारपणे कुºहाड चालवत हजारो वर्षांपासून सळसळणारे जंगल विकासाच्या नावाखाली सपाट करून डोंगरच्या डोंगर उघडे-बोडके केले जात आहेत. गगनबावडा तालुका राजरोसपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे सपाट आणि उघडा बोडका होऊन रूक्ष होत चालला आहे.

तालुक्यात तामजाई, वळताई, कोदे, बोरबेट, अणदूर, गगनबावडा, पळसंबे अशी अनेक दुर्मीळ वनसंपदेने संपन्न व घनदाट झाडीने नटलेली ठीकाणे आहेत; पण, याकडे गर्भश्रीमंतांची नजर वळली आहे. तामजाईसारख्या घनदाट जंगलाच्या पठारावर शेकडो एकराचे सपाटीकरण करून कोट्यवधी रूपयांची जंगल संपत्ती डोळ्यादेखत नष्ट होताना वन खाते काय करते आहे. सामान्य शेतकऱ्याला आपल्या बांधावरचे एक झाड तोडताना नियम सांगणारे वन खाते अशा सपाटीकरणावेळी नियमात अर्थकारण शोधते काय ? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला आहे. असे सपाटीकरण तालुक्याच्या अन्य भागातही मोठ्या प्रमाणात होत आहे.

तालुक्या बाहेरुन आलेल्यांनी कवडीमोल किमतीने सर्व सामान्यांच्या जमिनी घेऊन मालकी हक्क प्रस्तापित केला व संह्यांद्रिच्या संवेदनशील पर्वत रांगांत हजारो वर्षांच्या जंगलावर अमानुषपणे कुºहाड चालवायला सुरुवात केली आहे. आधुनिक शेतीच्या नावाखाली शेकडो एकर जमिनीचे सपाटीकरण होत असताना त्याला विरोध न करता आपण मात्र ‘पर्यावरण वाचवा देश वाचवा’ अशा घोषणा देत ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ही प्रत्येक वर्षाला मोठ्या उत्साहात साजरा करतो. शतकोटी वृक्षयोजना राबवतो. याचा काय फायदा ? तालुक्यातील जंगल क्षेत्र मात्र वाढण्याऐवजी प्रत्येक वर्षाप्रमाणे कमी कमी होत जाते आहे याचे गम्य काय ? कागदोपत्री लाखो वृक्षांची लागवड करून अनुदानात अर्थ शोधण्यापेक्षा दररोज हजारो रूपयांची प्राप्ती असणारी मंडळी वृक्षांची कत्तल करुन अधुनिक शेतीच्या नावाखाली भाजीपाला पिकवत वर्षाला कांही हजार रूपयांसाठी शेती करून काय साध्य करतात हे शोधून यावर प्रकाश टाकला तर वेगळीच माहिती उजेडात येईल. मालकी हक्कातील जंगलावर आधुनिक वनशेती केली तर आर्थिक प्राप्तीबरोबत पर्यावरण संरक्षण होईल.पाणवटे बंदिस्त : प्राणी मानवी वस्तीतमालकी हक्काच्या नावाखाली जमिनी भोवती काटेरी तारेचे कुंपणे केल्याने प्राण्यांचे पाणवटे बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे.वृक्षतोड व जमीन सपाटीकरणामुळे जंगलातील अनेक अन्नसाखळीतीत दुवे निखळले. त्यामुळे अनेक वनस्पती व प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर  जंगल तोडुन आधुनिक शेतीसाठी अनेकांनी केली अनुदानाची उचलगगनबावडा तालुक्यातील तामजाई पठारावरील शेकडो एकर जमिनीवरील वृक्षांची कत्तल करून आधुनिक शेतीच्या नावाखाली सपाटीकरण करण्यात आले आहे.