शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून कनाननगरातील तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून, दोन हल्लेखोर ताब्यात

By उद्धव गोडसे | Updated: July 2, 2024 18:36 IST

दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून राजारामपुरी येथील १५ व्या गल्लीत आर. के. वालावलकर प्रशालेजवळ पंकज निवास भोसले (वय ३२, मूळ रा. कनाननगर, सध्या रा. राजारामपुरी) याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला. खुनाची थरारक घटना मंगळवारी (दि. २) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून गणेश विक्रम काटे आणि नीलेश विक्रम काटे (दोघे रा. कनाननगर) या भावांना ताब्यात घेतले, तर अमित गायकवाड याच्यासह आणखी एक संशयित हल्लेखोर पसार झाला.राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनाननगर येथील पंकज भोसले हा राजारामपुरीतील व्यावसायिक मनिष संबरगे यांच्याकडे कारचालक म्हणून काम करीत होता. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो कार घेऊन संबरगे यांच्या घरी पोहोचला. कार पार्क केल्यानंतर बाहेर रस्त्यावर थांबलेल्या चौघांनी पंकज याला बोलवून घेतले. काही अंतर बोलत गेल्यानंतर पाठीमागून एकाने पंकजच्या डोक्यात काठी मारली. जीव वाचवण्यासाठी पंकज धावत सुटला. मात्र, कर्णिक पथ चौकात त्याला पाडून चौघांनी हल्ला चढवला. एकाने छातीवर बसून दगडाने त्याचे डोके ठेचले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंकजला चौघे पाच मिनिटे मारत होते. मारामारीचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी पोहोचलेले पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे आणि कॉन्स्टेबल अरविंद पाटील यांनी गणेश काटे आणि नीलेश काटे या दोन हल्लेखोरांना पकडले. हल्लेखोर अमित गायकवाड आणि त्याचा एक साथीदार दुचाकीवरून निघून गेले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.गंभीर जखमी अवस्थेतील भोसले याला पोलिसांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. हल्ल्याची माहिती मिळताच भोसले याची आई, दोन बहिणी आणि मित्र सीपीआरमध्ये पोहोचले. सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर कनाननगरातील तरुणांनी गर्दी केली होती. राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस