शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

गडहिंग्लज येथील हरळीनजीक अपघात, कल्याणच्या तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 1:15 PM

गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हरळीनजीक दुचाकी स्लिप होवून झालेल्या अपघातात कल्याणच्या तरूणाचा मृत्यू झाला. ओंकार हरिशचंद्र शिंदे (वय २०, मूळगाव रत्नागिरी, सध्या रा. चिंचपाडा रोड, कल्याण जि. ठाणे) असे त्याचे नाव आहे. रविवारी (२७) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

ठळक मुद्देगडहिंग्लज येथील हरळीनजीक अपघात, कल्याणच्या तरूणाचा मृत्यूलॉकडाऊनमुळे मित्राच्या गावी आलेला अनाथ मुलगा

गडहिंग्लज : गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हरळीनजीक दुचाकी स्लिप होवून झालेल्या अपघातात कल्याणच्या तरूणाचा मृत्यू झाला. ओंकार हरिशचंद्र शिंदे (वय २०, मूळगाव रत्नागिरी, सध्या रा. चिंचपाडा रोड, कल्याण जि. ठाणे) असे त्याचे नाव आहे. रविवारी (२७) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला.पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मूळचे वैरागवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संजय बिरंजे हे नोकरीनिमित्त कुटुंबियांसह कल्याण येथे राहतात. परंतु, लॉकडाऊनमुळे ते वैरागवाडीला आले आहेत. त्यांचा मुलगा शुभम याचा मित्र ओंकार हादेखील वैरागवाडीला आला होता. रविवारी (२७) रात्री जेवणानंतर शुभम व ओंकार हे दोघेही हिरोहोंडा मोटरसायकलीवरून (एमएच ०२ बीएच ७०५८) फिरण्यासाठी घराबाहेर पडले.ओंकार हा गाडी चालवित होता तर शुभम मागे बसला होता. दरम्यान, हरळी बुद्रूक येथे इंचनाळ फाट्यानजीक दुचाकी स्लिप होवून दोघेही खाली पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ओंकार बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शुभम बिरंजे याच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. हवालदार संभाजी जाधव अधिक तपास करीत आहेत.अनाथ मुलगाओंकारच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तो आत्याकडे कल्याणला राहत होता. त्याची विवाहित बहिणदेखील तेथेच राहते. शेजारी राहत असल्यामुळे शुभमशी त्याची मैत्री झाली होती. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये तोही शुभमबरोबर गडहिंग्लजला आला होता. ओंकारच्या अपघाती मृत्यूने त्याच्या बहिणीला मोठा धक्का बसला.धोकादायक वळणवर्षापूर्वी हरळीकडून इंचनाळकडे जाणाऱ्या याच वळणावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तीन महाविद्यालयीन युवकांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याच धोकादायक वळणावर ओंकारचाही बळी गेल्याने वर्षापूर्वीच्या त्या अपघाताची चर्चा घटनास्थळी होती.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर