शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार, ‘थेट पाईपलाईन’चे काम ३१ मेपूर्वी होणे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:24 IST

योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या चाचणीकरिता तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे.

कोल्हापूर : शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी ३१ मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे योजनेचे ठेकेदार जीकेसी कन्स्ट्रक्शन यांनी उर्वरित कामासाठी आणखी सहा महिन्याची मुदत वाढवून मागितली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने २०१४ मध्ये वर्क ऑर्डर दिल्यापासून आतापर्यंत ठेकेदाराला काम करण्याकरिता चारवेळा मुदतवाढ दिली आहे. आता पाचव्यांदा मुदतवाढ मागितली आहे. योजनेच्या कामांना केंद्र तसेच राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाकडून परवानगी मिळण्यात झालेला उशीर तसेच कोरोना संसर्ग व लॉकडाऊन यामुळे दोन वर्ष काम बंद राहिल्यामुळे योजनेचे काम रखडले आहे.

दि. ३१ मेपूर्वी काम पूर्ण करावे म्हणून ठेकेदारावर प्रशासनाकडून दबाव टाकला जात होता. प्रत्येक आठवड्याला बार चार्टप्रमाणे काम झाले की नाही, याची छाननी केली जात होती. गतवर्षी डिसेंबरपर्यंत पाऊस पडत राहिल्याने कामात व्यत्यय आला. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर साधारणपणे फेब्रुवारीपासून कामाने गती घेतली आहे.

दोन जॅकवेलसह इन्स्पेक्शन वेलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ४६ मीटर उंचीचे दोन जॅकवेल आता ४० मीटर उंचीपर्यंत पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे जॅकवेलची कामे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न आहे. सध्या कामाची गती वाढली असली तरी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्धारित वेळेत पूर्ण होणे अशक्य आहे.

चाचणीलाच लागणार तीन महिने

योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या चाचणीकरिता तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. निविदेतील अटीनुसार ५२ किलोमीटरच्या जलवाहिनीची चाचणी दोनवेळा करावी लागणार आहे. त्याकरिता तीन महिने लागणार आहेत.

  • काळम्मावाडी थेट पाईपलाईन कामाची स्थिती
  • पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण
  • ५२ कि.मी. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण
  • स्काडाचे काम पूर्ण, लवकरच टेस्टिंग करणार
  • बीपीटी टँकचे काम पूर्ण, पायऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात
  • जलवाहिनीवर ७२ व्हॉल्वपैकी ५० व्हॉल्व बसविले
  • धरण क्षेत्रातील ४६ मीटर उंचीच्या जॅकवेलचे काम ४० मीटरपर्यंत पूर्ण.
  • उर्वरित काम मेअखेर पूर्ण करण्याचे नियोजन
  • ३३ केव्ही ट्रान्समिशन लाईन २७ कि.मी.पैकी १९ कि.मी.पर्यंतचे काम पूर्ण
  • जॅकवेल पूर्ण झाल्यानंतर पंप बसविणार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी