शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेला कुर्डूमध्ये गळती, लाखो लिटर पाणी वाया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 16:05 IST

पाणी पूजन समारंभानंतर काही तासातच मोठ्या प्रमाणात गळती

सडोली (खालसा): कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी काळमवाडी- कोल्हापूर बहुचर्चित थेट पाईपलाईन योजनेचे पाणी पूजन समारंभ होऊन काही तासातच हळदी कुर्डू (ता.करवीर) दरम्यानच्या ओढ्यानजीक पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले पाण्याचे ५०ते ६० फूट उंचीचे फवारे हवेत उडत होते. यामुळे शेजारी असणाऱ्या ऊस शेतीचे नुकसान झाले. काल, शुक्रवारी रात्री काळम्मावाडी - कोल्हापूर थेट पाईप लाईनचे पाणी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोचून काही तासातच उलटल्यानंतर हळदी कुर्डू तालुका करवीर येथील पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली. सकाळी शेतकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. गळती थांबवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हॉल बंद करून देखील बरेच तास हवेत पाण्याचे उंच फवारे सुरू होते. गळती ओढ्यालगत झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टळले. ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाढले होते. यामुळे गळतीची तीव्रता लक्षात येत होती. गळती दुरुस्तीसाठी दुपारी यंत्रणा सक्रिय झाली होती. पाण्याचा दाब कमी होण्यासाठी गळती जवळील हॉलमधून ओढ्यात हजारो लिटर पाणी सोडण्यात ओढ्यात सोडून पाईप निकामी करण्यात आली. व दुरुस्ती करण्याचे काम दुपारनंतर सुरू करण्यात आले. हे पाणी नजीकच्या शेतात गेल्यामुळे बाजीराव चौगले व अन्य शेतकऱ्यांचे ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच कुर्डू माळावरती व देवाळे येथील शेजारी गळती लागली आहेत. गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी