शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा, गळतीचे काम अपूर्णच; पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:57 IST

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला वरदायी ठरलेल्या काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा

सोळांकूर : महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला वरदायी ठरलेल्या काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा असल्याने व पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट दिसत आहे. या धरणावर अवलंबून असणाऱ्या पिकांना पाणी मिळत नसल्याने काही ठिकाणी पिके वाळली आहेत तर काहींनी उस पिकाची कापणी सुरू केली आहे. अत्यंत भयानक वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.आज धरणामध्ये मृतसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातील ५०० क्युसेस पाणी पिण्यासाठी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणी कमी असल्याने विद्युत जनित्र केंद बंद असून डाव्या व उजव्या कालव्यातील पाणी प्रवाह बंद करण्यात आला आहे. ऊस पिके वाळली असून भात पिकांची दुबार पेरणी करावी लागणार आहे.याचवर्षीप्रमाणे १३ जून २००७ रोजी केवळ असाच मृतसाठा शिल्लक राहिला होता. पाऊस वेळेवर लागल्याने अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नव्हती. २० जून २०१९ रोजी २.७३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता . मात्र योग्य नियोजन व पावसाची सुरुवात वेळेत झाल्याने कोणतीही हानी झाली नाही.यावर्षी पाऊस लांबल्याने धरणावर अवलंबून असणारी पिके वाळू लागली आहेत. पाणी वेळेत न मिळाल्याने काही पिके वाळली आहेत. ती पिके शेतकरी कापून जनावरांना घालू लागले आहेत.

मुख्य भिंतीच्या गळतीचे काम अपूर्णच..धरणाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून या गळतीला वाचा फोडली होती .यावर्षी काम करण्याच्या उद्देशाने पाठवलेला प्रस्ताव मंजूर न झाल्याने गळती काम अपूर्णच राहणार असे दिसत आहे. यावर्षी गळतीचे काम करण्याची संधी उपलब्ध असताना केवळ निधीअभावी रखडणार असल्याचे चित्र दिसत आहे. पिण्याचे पाणी जपून वापरावे म्हणून गावांमध्ये दवंडी देत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी