हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 19:18 IST2022-01-10T19:17:52+5:302022-01-10T19:18:22+5:30

शेतजमिनीच्या वादातून धामणे येथे झालेल्या खून प्रकरणात होता कारागृहात.

Kalamba prison inmate dies of heart attack | हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू

हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहातील न्यायालयीन बंदी संजय महादेव सावंत (वय ४८ रा.धामणे, ता.आजरा) याचा रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतजमिनीच्या वादातून धामणे येथे झालेल्या खून प्रकरणात तो कारागृहात होता. याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेतजमिनीच्या वादातून नोव्हेंबर, २०२० मध्ये धामणे येथे एकाचा खून झाला होता. या गुन्ह्यात संजय सावंत याला अटक झाली होती. यानंतर त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती. काल, रविवारी रात्री त्याच्या छातीत दुखू लागले.

त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title: Kalamba prison inmate dies of heart attack