शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी उसळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:19 IST

अमर पाटील  कळंबा: दमदार पावसामुळे कळंबा तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहायला सुरवात झाली. सोशल मीडियावर याचे ...

अमर पाटील कळंबा: दमदार पावसामुळे कळंबा तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहायला सुरवात झाली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ आणि फोटो झळकू लागल्याने पर्यटकांनी गर्दी केली. तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे कात्यायनी टेकड्यातुन वाहणारे सातही नैसर्गिक नाले पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागल्याने तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मोठया सांडव्यानजीकच्या लहान सांडव्यातून ही पाण्याचा मोठा विसर्ग वाढला आहे. एकंदरीत जुलैच्या मध्यापर्यंत अवघी चार फुटांवर स्थिरावलेली पाणीपातळी आठवड्याभराच्या मुसळधार पावसामुळे सत्तावीस फुटांवर गेली. तलाव भरल्याने उपनगरे व लगतच्या ग्रामीण जनतेच्या पाण्याची चिंता मिटल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाकडून समाधान व्यक्त होत आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी तलावाच्या मनोऱ्यानजीकचा पदपथ निसरडा झाला असून धोकादायक मनोऱ्याचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. सेल्फी काढण्याच्या नादात अनुचित प्रकार जीवावर बेतण्याची शक्यता असल्याने हौशी पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हौशी पर्यटकांनी ओसंडून वाहणाऱ्या सांडव्यावरून चालत जात वाहत्या पाण्यात पोहणे टाळावे.

तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागल्यानंतर परिसरात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी हुल्लडबाजांचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी हुल्लडबाजांना पोलिसी खाक्या दाखवण्याची गरज आहे.  - पूनम उत्तम जाधव, ग्रा. प. सदस्या, कळंबा 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस