शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा कारागृह हाऊसफुल्ल; सांगलीतील १२० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 13:56 IST

कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण आणखी वाढणार

कोल्हापूर : सांगली जिल्हा कारागृहाला महापुराच्या पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तेथील १२० कैदी कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात स्थलांतरित करण्यात आले. गुरुवारी ८० आणि शुक्रवारी ४० कैदी कळंब्यात दाखल झाले.कोल्हापूर, सांगली भागांत अतिवृष्टी सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने बहुतांश नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. कृष्णा नदीच्या पाणीपातळीचा धोका सांगली जिल्हा कारागृह वर्ग- दोनला आहे. तो ओळखून कैद्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे. या कारागृहात कैद्यांची ४०० क्षमता आहे. पैकी १२० कैदी कळंबा कारागृहात स्थलांतरित केले आहेत. यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कारागृहात प्रवेश देण्यात आला. यामध्ये २० महिला कैदी आणि ६० पुरुष कैदी आहेत.

सांगली कारागृहाची दुमजली इमारत आहे. पाणीपातळी वाढल्यास उर्वरित कैद्यांच्याही स्थलांतराची शक्यता आहे. या कैद्यांसह कारागृहातील अन्नधान्य, कागदपत्रे, शस्त्रात्रे, दारूगोळाही सुरक्षित ठिकाणी हलविला असल्याचे सांगली कारागृहाचे अधिकारी महादेव होरे यांनी सांगितले.

२५ कैद्यांचे स्थलांतरकळंबा कारागृहातील खून, जीवघेणा हल्ला प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या २५ कैद्यांना अन्य जिल्ह्यांतील कारागृहांमध्ये स्थलांतरित केले आहे. त्यांना नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ या कारागृहांत पाठविले आहे.

कळंबा कारागृह हाऊसफुल्लकळंबा कारागृहात कैद्यांची क्षमता १६९९ इतकी आहे. नव्याने दाखल झालेले १२० कैदी धरून २२२० कैदी कारागृहात आहेत. त्यामुळे कारागृह हाऊसफुल्ल झाले असून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण आणखी वाढणार आहे.

सांगलीतून स्थलांतरित झालेल्या १२० कैद्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. त्यांना सध्या असलेल्या बरॅकमध्ये आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कैद्यांची स्वतंत्र बरॅकमध्ये व्यवस्था केली आहे. - विवेक झेंडे, अधीक्षक, कळंबा कारागृह

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंगPrisonतुरुंग