कळंबा फिल्टर हाऊस बहुरंगी लढत

By Admin | Updated: October 20, 2015 00:17 IST2015-10-20T00:06:09+5:302015-10-20T00:17:02+5:30

पालकमंत्र्यांचे विशेष लक्ष प्रभाग क्र. ६८

Kalamba Filter House struggles with multicolored | कळंबा फिल्टर हाऊस बहुरंगी लढत

कळंबा फिल्टर हाऊस बहुरंगी लढत

कोल्हापूर : येथील कळंबा फिल्टर हाऊस प्रभागात बहुरंगी लढत होत आहे. प्रभाग अनुसूचित जाती-जमाती महिलेसाठी आरक्षित असूनही चुरस निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे.
या प्रभागात आमदार महादेवराव महाडिक गट व माजी मंत्री सतेज पाटील गटाभोवती राजकारण फिरत आहे. येथील लढतीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. भाजप-ताराराणी आघाडीकडून नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी पत्नी शीतल यांना रिंगणात उतरविले आहे. रामुगडे हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
दिनकर कांबळे यांच्या पत्नी अलका राष्ट्रवादीतून लढत आहेत. अलका कांबळे यांनी २००० मध्ये निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. यावेळी कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हायचेच, या निर्धाराने प्रचारयंत्रणा सक्रिय आहे.
दुर्वास कदम यांच्या पत्नी वृषाली काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. दुर्वास कदम यांनी २००५ मध्ये शिवसेनेकडून संभाजीनगर प्रभागातून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. यावेळी पूर्ण ताकदीने ते पत्नीला नगरसेवक करण्यासाठी प्रचार करत आहेत. शिवसेनेकडून वैशाली सुरेश कांबळे लढत आहेत. सासने कॉलनी महिला बचत गटाच्या त्या सक्रिय सदस्य आहेत. त्या माध्यमातून त्यांचा भागात संपर्क आहे. हिंदू महासभेतून कल्याणी नागेश चौगुले, वासंती अनिल शिंदे अपक्ष रिंगणात आहेत. ‘साम, दाम, दंड, भेद’ नीतीचा वापर करून झोपडपट्टीतील एकगठ्ठा मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

Web Title: Kalamba Filter House struggles with multicolored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.