शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाहूंच्या जयंतीदिनी ‘स्वाभिमानी’ची ‘कैफियत’ पदयात्रा; शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांच्या उर्वरित १०० रुपयांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:03 IST

'चंद्रकांतदादांनी नुसते बोलू नये, विषय संपवावा'

कोल्हापूर : मागील (२०२२-२३) गळीत हंगामातील एफआरपी सोडून ५० व १०० रुपये देण्याच्या आश्वासनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर पडला असून, शक्तिपीठ महामार्गाच्या आडून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. याविरोधात राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीदिनी बुधवारी जनकस्थळ (कागल) ते स्मृतिस्थळ (कोल्हापूर)पर्यंत ‘कैफियत’ पदयात्रा काढणार असल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.राजू शेट्टी म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती झाली, त्यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती मोठ्या धामधुमीत साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दल आम्हाला आनंदच आहे; पण त्यांच्या विचाराने सरकारचे काम सुरू आहे का? मागील गळीत हंगामात साखरेचे दर चांगले राहिल्याने एफआरपी सोडून साखर कारखान्यांकडे जादा पैसे राहिले होते. ते पैसे मिळावेत, यासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखला होता, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला होता. ज्या साखर कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी पैसे दिले आहेत, त्यांनी शंभर तर तीन हजार पेक्षा जास्त दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये शेतकऱ्यांना देण्याचे ठरले होते. अनेक कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवले आहेत, सरकारकडून त्याला मान्यता दिली जात नाही. त्याचबरोबर कोणाचीही मागणी नसताना शक्तिपीठ महामार्गाचे घाट घातला जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांना चिरडायचे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केले, त्या राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जात आहे.

सरकारची संवेदनशीलता संपली असून, त्याला जाग आणण्यासाठी कागल ते कोल्हापूर ‘कैफियत पदयात्रा’ काढणार आहे. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांची दीडशे मुले सहभागी होणारबुधवारी सकाळी आठ वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या कागल येथील जन्मस्थळाला अभिवादन करून कैफियत पदयात्रेला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत कोल्हापुरात येणार असून, यामध्ये शेतकऱ्यांची दीडशे मुले सहभागी होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

दादांनी नुसते बोलू नये, विषय संपवावाशक्तिपीठाचा प्रश्न संपवल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील सांगत आहेत. त्यांनी नुसते बोलू नये. महामार्ग रद्द करून तो विषय संपवावा, असा टोला शेट्टी यांनी हाणला.

पदयात्रेने काहीतरी पदरात पडतेचयापूर्वी पंढरपूरला विठ्ठलाला साकडे घालून बारामतीपर्यंत यासह अनेक पदयात्रा काढल्या त्या त्यावेळी शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडले आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर निश्चित यश मिळते, याही वेळेला काहीना काही पदरात पडेल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना