शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कागल सीमा नाका ८ दिवसांत कार्यान्वित, अदानी समूहाकडे व्यवस्थापन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:04 IST

जे. एस. शेख कागल : गेली सात ते आठ वर्षे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या खासगी तत्त्वावरील येथील बहुचर्चित एकात्मिक ...

जे. एस. शेखकागल : गेली सात ते आठ वर्षे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या खासगी तत्त्वावरील येथील बहुचर्चित एकात्मिक सीमा तपासणी नाका येत्या आठ ते दहा दिवसांत सुरू करण्यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. रंगरंगोटी व मार्गदर्शक पट्टे मारले आहेत. लाईट व सिग्नल सुरू केले आहेत. महामार्गावरून जाणारी-येणारी सर्व वाहने या आधुनिक तंत्रज्ञाने सुसज्ज असलेल्या नाक्यातून तपासणी होऊनच पुढे जाणार आहेत.सुरुवातीला गुजरातमधील सदभाव कंपनीकडे हा नाका उभारणी करण्याचे काम होते. नाका उभारणी पूर्ण होता होता सद्भावकडून हा नाका अदानी समूहाने आपल्याकडे घेतला. त्यानंतर तो सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असतानाच बांधकामाचे पैसे थकबाकी असल्याच्या कारणावरून एका कंपनीने न्यायालयात धाव घेतली व जोपर्यंत आपले पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत हा नाका सुरू करण्यास परवानगी देऊ नये अशी न्यायालयाला विनंती केली होती. त्यामुळे गेली तीन वर्षे हा नाका न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता.विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महिना हा न्यायालयीन तिढा सुटला आणि चेक पोस्ट सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, चेक पोस्ट सुरू केल्यानंतर वाहनधारकांच्या मध्ये नाराजी निर्माण होईल तसेच स्थानिक पातळीवरही रोष निर्माण झाला तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून तो सुरू करण्यात आला नव्हता असे समजते.विविध कारणांवरून झाला विरोधया नाक्यासाठी जमीन संपादन करण्यापासून संघर्ष सुरू आहे. यासाठी दहा ते बारा वर्षांचा कालावधी लोटला आहे. येथे उभारण्यात आलेले दुकानगाळे तसेच कर्मचारी घेण्यावरूनही स्थानिक लोक आणि कंपनीमध्ये वाद निर्माण झाला होता. नंतर नाका सुरू करण्याच्यावेळी जिल्ह्यातील मालवाहतूक ट्रकचालक मालक संघटनेने या ठिकाणी मोठे आंदोलन करून हा नाका सुरू करण्यास विरोध दर्शविला होता.

असा आहे तपासणी नाका

  • महामार्गाच्या दोन्ही बाजूस मिळून ५२ एकर जमीन यासाठी संपादित करण्यात आली आहे. दोन्ही बाजूला प्रत्येकी १० लेन असून ०७ मोठ्या वाहनांसाठी ०३ लहान वाहनांसाठी आहेत.
  • यामधून मालवाहतूक व इतर वाहने जाणार आहेत. त्यावेळी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वजन व वाहन तपासणीसह मालवाहतुकीचे अन्य नियम तपासले जातील. दुचाकी व बैलगाडीसुद्धा यातूनच घेण्याची आहे. त्यामुळे महामार्गावरून कागलकडे येताना आणि निपाणीकडे जाताना प्रत्येक वाहनाला येथे वळावे लागणार आहे. मात्र, मालवाहतूक वाहने वगळता इतर वाहनांवर कोणता कर आकारला जाणार नाही.
  • आरटीओ (परिवहन) तपासणीबरोबरच राज्य उत्पादन शुल्क व जीएसटी या तपासण्याही या एकाच नाक्यावर होणार आहेत. खाजगी कंपनी हा नाका चालवेल आणि शासनाचे अधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरAdaniअदानी