कडलगेत खासदार, आमदारांकडून पूरपरिस्थितीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:20+5:302021-07-30T04:25:20+5:30
हलकर्णी : कडलगे (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी नदीला आलेल्या पुराने झालेल्या नुकसानाची पाहणी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश ...

कडलगेत खासदार, आमदारांकडून पूरपरिस्थितीची पाहणी
हलकर्णी : कडलगे (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी नदीला आलेल्या पुराने झालेल्या नुकसानाची पाहणी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांनी केली. गावातील ८३ घरांची पडझड झाली असून, योग्य पंचनामे करून पुढील कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे यांना केल्या.
ज्या गावातील ओढ्यामुळे ही पूरपरिस्थिती उद्भवली होती, त्या ओढा परिसराची यावेळी पाहणी करून त्यावर काय उपाययोजना करता येईल, याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक अंतर्गत रस्त्यासाठी निधी मिळावा, यासाठी निवेदन दिले. जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, बाबासो आरबोळे, अमर चव्हाण, सतीश शिरूर, गंगाधर व्हसकोटी, रामाप्पा करिगार, जितेंद्र जयकुमार आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.