कबनूर हायस्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:21+5:302021-02-05T07:03:21+5:30
कबनूर : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये येथील कबनूर हायस्कूल-ज्युनिअर खेळाडूंची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ...

कबनूर हायस्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
कबनूर : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये येथील कबनूर हायस्कूल-ज्युनिअर खेळाडूंची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. निवडी चाचणी स्पर्धेत श्रुती कांबळे, समीक्षा अडसुळे, सार्थक निंबाळकर, श्रेयस भेंडेकर, सुरेखा फराकटे (सर्व उंच उडी -प्रथम), ओंकार किंदळकर, आफनाज फकीर (८० हर्डल्स -द्वितीय) या खेळाडूंची निवड झाली. खेळाडूंना क्रीडाशिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. मुख्याध्यापक बी. बी. मगदूम यांनी स्वागत केले. यावेळी राजाराम वाकरेकर, सुभाष काडाप्पा, एस. एन. पाटील, संजय चौगुले उपस्थित होते. उमेश बरगाले यांनी आभार मानले.
(फोटो ओळी) २८०१२०२१-आयसीएच-०५
राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार जयकुमार कोले यांनी केला. यावेळी राजाराम वाकरेकर, सुभाष माने, बी. बी. मगदूम, आदी उपस्थित होते.