शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा;‘फुलेवाडी’ची खंडोबा ‘अ’ वर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:55 PM

अ‍ॅग्म्यु रिचर्डच्या एकमेव गोलच्या जोरावर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर खंडोबा ‘ब’ने संध्यामठ तरुण मंडळवर २-० अशी मात केली.

ठळक मुद्देके. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा;‘फुलेवाडी’ची खंडोबा ‘अ’ वर मातखंडोबा ‘ब’कडून संध्यामठ पराभूत

कोल्हापूर : अ‍ॅग्म्यु रिचर्डच्या एकमेव गोलच्या जोरावर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर खंडोबा ‘ब’ने संध्यामठ तरुण मंडळवर २-० अशी मात केली.छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी ‘फुलेवाडी’ व ‘खंडोबा-‘अ’ यांच्यात झालेल्या सामन्यात प्रारंभापासून दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करीत पूर्वार्धात चूरस निर्माण केली. यात ‘फुलेवाडी’कडून मिशेल, अनिकेत वरेकर, रोहीत मंडलिक, प्रतीक सावंत, तर खंडोबाकडून कपील शिंदे, सागर पोवार, अजिज मोमीन, विकास बहारे यांनी आक्रमक व वेगवान चढाया केल्या; मात्र दोन्ही संघांना पूर्वार्धात गोल करण्यात यश आले नाही.उत्तरार्धात फुलेवाडी संघाने खेळात बदल करीत वेगवान चढाया आणि शार्ट पासिंगवर भर दिला. या बदलामुळे ४७ व्या मिनिटास ‘फुलेवाडी’ संघाकडून अ‍ॅग्मु रिचर्ड याने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर खंडोबाकडून कपील शिंदे, अजिज मोमीन यांनी सामन्यांत बरोबरी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले; मात्र यात अखेरपर्यंत यश आले नाही; त्यामुळे हा सामना ‘फुलेवाडी’ संघाने १-० असा जिंकला.तत्पूर्वी झालेल्या सामन्यात ‘खंडोबा-‘ब’ने संध्यामठ तरुण मंडळचा २-० असा पराभव केला. ‘खंडोबा-‘ब’कडून दिग्विजय आसणेकर, प्रथमेश पाटील, मंदार पाठक यांनी, तर संध्यामठकडून योगेश सरनाईक, आशिष पाटील, स्वराज्य सरनाईक, विराज साळोखे यांनी वेगवान चढाया केल्या. ‘खंडोबा-‘ब’कडून हर्षद शिंदे याने ४० व्या मिनिटाला गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्यांच्या उत्तरार्धात बरोबरी साधण्यासाठी संध्यामठकडून जोरदार प्रयत्न झाले; मात्र त्यांना बरोबरी साधण्यात यश आले नाही. याउलट ‘खंडोबा-‘ब’कडून ऋदेश मांडरेकर याने ७१ व्या मिनिटास गोल करीत ही आघाडी २-० अशी भक्कम केली. याच जोरावर सामनाही ‘खंडोबा-‘ब’ने जिंकला. 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर