शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतीच्या आयुष्याला मिळाला मंदारचा 'आधार'; कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात थाटामाटात पार पडला विवाह सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:53 IST

कोल्हापूर : वार मंगळवार.. सायंकाळी पाचची वेळ.. बालकल्याण संकुलात लगबग सुरू झाली. संकुलाच्या दारात रांगोळ्या रेखाटण्यात आल्या.. मांडव उभारला, हलगीच्या ...

कोल्हापूर : वार मंगळवार.. सायंकाळी पाचची वेळ.. बालकल्याण संकुलात लगबग सुरू झाली. संकुलाच्या दारात रांगोळ्या रेखाटण्यात आल्या.. मांडव उभारला, हलगीच्या तालावर बाल संकुलातील मुलांनी बेभान नृत्य सुरू केले. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरही हजर झाले. अंतरपाट धरला गेला, मंगलाष्टके सुरू झाली अन् अखेर बालकल्याण संकुलातील लाडकी सुकन्या ज्योती हिचा रुकडी(ता. हातकणंगले) येथील मंदार संजय खटावकर यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह झाला. डॉ. रागिणी आणि डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी कन्यादान केले.या सोहळ्यासाठी बालकल्याण संकुलात जय्यत तयारी करण्यात आली होती. संजय आवळे यांच्या हलगी पथकाने सोहळ्याची रंगत वाढवली. सायंकाळी या सोहळ्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, पद्मजा तिवले, सुरेश शिपुरकर, नंदिनी पटोडिया, एस. एन. पाटील, व्यंकाप्पा भोसले, शिरीष बेरी, मानसी बेरी, सी. डी. तेली, लोकमतचे उपवृत्त संपादक विश्वास पाटील, डॉ. संदीप पाटील, पद्मजा गारे, ॲड. अश्विनी खाडे, ॲड. शिल्पा सुतार, दीपा शिपूरकर उपस्थित होते. जन्मापासून संस्थेत वाढलेल्या ज्योतीला निरोप देताना संकुलवासीयांचे डोळे पाणावले.यांच्यामुळेच सोहळा बनला आनंदीनीलेश चव्हाण (मांडव, विद्युत रोषणाई), भास्कर भोसले (स्टेज डेकोरेशन) स्वप्निल जठार (मंगळसूत्र), द्वारकादास श्यामकुमार कापड दुकान (लग्न बस्ता,राजाराणी कपाट), श्री कन्स्ट्रक्शनचे एस. एन. पाटील (कानातील टॉप्स), एस. व्ही. ज्वेलर्स (मनी मंगळसूत्र), नामिदेवी अनिल कश्यप (सागवानी बेड), आराम गादी कारखाना (गादी सेट), डॉ. प्रवीण आणि योगिता कोडोलीकर (वॉशिंग मशीन), सचिन ग्लास ट्रेडर्स, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि रणरागिनी ग्रुप (भांड्याचा सेट) , भारती मुद्रणालय (भांड्याचा सेट), किरण तिवले (पूजेचे साहित्य),

गुरुप्रसाद सासमिले, ॲड. अश्विनी खाडे (बांगड्या, मेहंदी कोन, नेलपेंट), राजगोंडा शेटे (मंडप सजावट साहित्य), शा.कृ.पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्ट (वधू-वर कपडे), अनुराधा पित्रे (मेकअप साहाय्य), नयना खत्री (पेढे), सोनाली निकम (प्रवासी बॅग, ड्रेस, पर्स), हरिप्रिया बॅग हाऊस व रूपाली फाटक (प्रवासी बॅग, बाऊल सेट), कुमार तोडकर (गजरे), नूपुर फुटवेअर (चप्पल), पुष्पक लेडीज वेअर, मोहिनी तोरस्कर व रेवती परब (कपडे), शिल्पा शहाजीराजे भोसले (पंजाबी ड्रेस), अविनाश भाले (स्वेटर, ब्लँकेट).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्न