शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

अवघ्या अडीच तासांतच वृद्धेचा डाव खल्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 9:18 PM

पाचगावमधील वृद्धेचा खून संशयित आरोपी संतोष निवृत्ती परीट (३५, रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, माळी कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर) याने टाकाळा येथील राजलक्ष्मी अपार्टमेंटच्या तळघरातील खोलीतच भिंतीवर डोके आपटून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्याने शुक्रवारीच (दि. ५) दुपारी अवघ्या अडीच तासांत खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती पुढे आली. संशयित परीट याला गुरुवारी न्यायालयाने दि. १८ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देवृद्धेचे डोके भिंतीवर आपटून खून : आठ दिवस पोलीस कोठडीमृतदेहाचे तुकडे केल्याबाबत संशयिताचे मौन

कोल्हापूर : पाचगावमधील वृद्धेचा खून संशयित आरोपी संतोष निवृत्ती परीट (३५, रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, माळी कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर) याने टाकाळा येथील राजलक्ष्मी अपार्टमेंटच्या तळघरातील खोलीतच भिंतीवर डोके आपटून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्याने शुक्रवारीच (दि. ५) दुपारी अवघ्या अडीच तासांत खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती पुढे आली. संशयित परीट याला गुरुवारी न्यायालयाने दि. १८ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली.सोन्याच्या दागिन्यांसाठी शांताबाई शामराव आगळे-गुरव (वय ७०, रा. जगतापनगर, पाचगाव, ता. करवीर) या वृद्धेची क्रूरपणे हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते राजाराम तलावासमोरील कृषी विद्यापीठाच्या माळावर फेकल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी सकाळी मृतदेहाचा कमरेपासून पायापर्यंतचा भाग, खांद्यापासून डावा हात, शिर असे अवयव पोलिसांना मिळाले. पोलिसांनी काही तासातच संशयित संतोष परीटला अटक केली.दरम्यान, शुक्रवारी (दि. ५) संशयित परीटच्या पत्नीच्या नातेवाइकाचे दिवसकार्य असल्याने त्याने तिला मोपेडवरून सकाळी दसरा चौकांत सोडले, तेथून तो पाचगाव येथे गेला. देवकार्याचे निमित्ताने वृद्धा शांताबाई आगळे यांना घेऊन तो एका भाड्याच्या रिक्षात बसवून मोपेडवरून सोबत टाकाळा येथे रूमवर आला. दुपारी बाराच्या सुमारास त्याने वृद्धेचे डोके भिंतीवर आपटून त्यांचा खून केल्याची कबुली दिली.दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी संशयित परीट राहत असलेल्या टाकाळा येथील राजलक्ष्मी अपार्टमेंटच्या तळघरातील खोलीची तासभर झडती घेतली. अपार्टमेंटमधील सीसी कॅमेरेही तपासले. त्यापैकी काही फुटेज ताब्यात घेतले.संशयिताचे तपासात सहकार्य नाहीसंशयित परीट हा तपास कामाला सहकार्य करत नसल्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितले. मृतदेहाचे धड अद्याप मिळाले नसल्याने तसेच ते टाकाळा येथून मृतदेहाचे अवयव कसे, कोठे नेले, तुकडे कोठे केले, आणखी कोणाचा सहभाग आहे काय? याचीही त्याने अद्याप माहिती पोलिसांना दिलेली नाही.मोपेडवरून मृतदेहाची विल्हेवाट शक्यसकाळी पत्नीला नातेवाइकांकडे सोडून आला, दोन्हीही मुले अकरा वाजता शाळेला गेली. दरम्यान, तो दुपारी १२ वाजता वृद्धेला रिक्षाने घेऊन अपार्टमेंटमध्ये आला. तो वृद्धेसोबत अपार्टमेंटमध्ये प्रवेशाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. तेथून तो तळघरातील खोलीत गेला. दुपारी अडीच वाजता त्याची दोन्हीही मुले शाळेतून घरी आली, सायंकाळी पत्नीही घरी आली, त्यावेळी संशयित घरीच असल्याचे चौकशीत आढळले. त्यामुळे दुपारी १२ ते अडीच वाजेपर्यंत त्याने वृद्धेचा डाव खल्लास केल्याची तसेच मृतदेहाचे अवशेष त्याने मोपेडवरून नेऊन फेकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.फायनान्स प्रतिनिधी व पत्नीकडे चौकशीसंशयिताने वृद्धेला ठार मारून तिचे दागिने तारण ठेवलेल्या फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी तसेच संशयिताची पत्नी यांच्याकडे गुरुवारी चौकशी केली.धड अद्याप गायबचपोलिसांना वृद्धेचे इतर अवयव मिळाले; पण अद्याप धड व उजव्या हाताचे अवशेष मिळाले नाहीत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर