शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Navratri2022: 'चांगभलं'च्या गजरात पार पडला 'जोतिबाचा पालखी सोहळा', कृष्ण रूपात बांधली आजची महापूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 14:28 IST

ढोल, तुतारी, डवर, कैंचाळच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून गेला

दत्तात्रय धडेल

जोतिबा : गुलाल खोबऱ्याची उधळण, चांगभलंचा गजर, पोलीस बँडची धुन अशा उत्साही अन् भक्तीमय वातावरणात जोतिबा डोंगरावरील आजचा पालखी सोहळा पार पडला. खंडेनवमीनिमित्त दिवे ओवाळणी, शस्त्र पुजन, घट उठविणचा विधी संपन्न झाला. आजच्या दिवशी जोतिबाची श्री कृष्ण रूपात महापूजा बांधण्यात आली होती.खंडेनवमी निमित  आज, मंगळवारी सकाळी ९ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देव सेवकाच्या लवाजम्यासह श्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाला. पालखी सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलंचा गजर केला. पोलीस बँडची धुन लक्षवेधी ठरली. ढोल, तुतारी, डवर, कैंचाळच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. ढोलीची झुलवे, डवरीची डवरी गीते, म्हालदाराची ललकारी झाली. पालखी समवेत श्रीचे मुख्य पुजारी, मानाचे समस्त दहा गावकर, देव सेवक, जोतिबा देवस्थान समितीचे प्रभारी दिपक म्हेत्तर,  सरपंच राधा बुणे उपस्थित होते.तोफेची सलामी होताचा पालखी सोहळ्याची सांगता झाली. सकाळी १० वाजता धुपारती सोहळ्याने जोतिबा, यमाई, तुकाई, भाव काई मंदिरातील घट उठविण्याचा विधी झाला. सडा रांगोली, पाय पुजनाने धुपारतीचे स्वागत करण्यात आले. महिलांनी दुध वाटप केले. शस्त्र पुजन करण्यात. कर्पुरेश्वर तीर्थ कुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला. दुपारी १. ३० वाजता परत जोतिबा मंदिरात धुपारतीची सांगता तोफेच्या सलामीने झाली. अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीJyotiba Templeजोतिबा