मुलीच्या लग्नातील खर्चाला फाटा देत जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:01+5:302021-05-07T04:25:01+5:30
जयसिंगपूर : मुलीच्या लग्नातील अतिरिक्त खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासत चिपरी (ता. शिरोळ) येथील शिवाजी बेडगे यांनी प्राथमिक ...

मुलीच्या लग्नातील खर्चाला फाटा देत जोपासली सामाजिक बांधिलकी
जयसिंगपूर : मुलीच्या लग्नातील अतिरिक्त खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासत चिपरी (ता. शिरोळ) येथील शिवाजी बेडगे यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मदतीचा हात दिला. लसीकरणासाठी २ हजार सिरिंज व १८०० पॅरॉसिटामल गोळ्या देण्यात आल्या. त्यामुळे बेडगे यांनी राबविलेला हा उपक्रम इतरांना आदर्शवत ठरत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बेडगे यांनी आपल्या मुलीच्या लग्नातील अतिरिक्त खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांनी उपकेंद्राला एक हजार सिरिंज व पॅरॉसिटामल गोळ्या भेट स्वरूपात दिल्या. यावेळी उपकेंद्राच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी बेडगे म्हणाले, कोरोना महामारी संपूर्ण जगावर येऊन ठेपली आहे. प्रत्येकाने एक पाऊल पुढे येऊन मदतीचा हात दिल्यास आरोग्य यंत्रणा मजबूत होऊन कोरोना हद्दपार होईल.
याप्रसंगी सरपंच अमृता गावडे, ग्रामविकास अधिकारी रजपूत, डॉ. शिवाजी पोवार, एस. एस. धर्माधिकारी, विनायक कुंभार, व्ही.डी. गावडे, एस. आर. नाईक, साजिदा मुजावर, तनुजा कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
फोटो - ०६०५२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - चिपरी (ता. शिरोळ) येथे शिवाजी बेडगे यांनी उपकेंद्रास साहित्य मदत स्वरूपात दिले.