शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिक्षण सहसंचालक हेमंत कठरेंसह तिघे एसीबीच्या जाळ्यात, ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

By उद्धव गोडसे | Updated: July 5, 2023 16:51 IST

शैक्षणिक वर्तुळात उडाली खळबळ

कोल्हापूर : शिक्षण संस्थेत नव्याने सुरू केल्या जाणा-या हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी आवश्यक सुविधा असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी झाली होती. त्यातील ३० हजार रुपये स्वीकारताना शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही रक्कम विभागीय शिक्षण सहसंचालक हेमंत कठरे आणि त्याचा स्टेनोग्राफर यांनी मागितल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने तिघांना अटक केली.विभागीय शिक्षण सहसंचालक हेमंत नाना कठरे (वय ४६, सध्या रा. अंबाई डिफेन्स, कोल्हापूर, मूळ रा. पाचवड, ता. खटाव, जि. सातारा), स्टेनोग्राफर प्रवीण शिवाजी गुरव (वय ३२, रा. पीरवाडी, ता. करवीर) आणि कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोंग (वय ३४, रा. राशिवडे, ता. राधानगरी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या पथकाने बुधवारी (दि. ५) दुपारी राजाराम कॉलेजच्या आवारातील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारदाराने मागणी केलेले तपासणी प्रमाणपत्र देण्यासाठी स्टेनोग्राफर प्रवीण गुरव याने विभागीय सहसंचालक प्रवीण कठरे यांच्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ती रक्कम कनिष्ठ लिपिक अनिल जोंग याच्याकडे देताना एसीबीने कारवाई करून तिघांना अटक केली. थेट विभागीय शिक्षण सहसंचालक एसीबीच्या कारवाईत अडकल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच या विभागातील लाचखोरी समोर आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग