सलग ५७ व्या रविवारी स्वच्छता मोहिम --स्वच्छतेसाठी जिजाऊ ब्रिगेड सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 17:08 IST2020-05-31T17:05:36+5:302020-05-31T17:08:30+5:30
आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, जयंती पंपींग स्टेशन, पंचगंगा नदी घाट, रिलायन्स मॉल पिछाडीस परिसर, बोंद्रेनगर, रंकाळा तलाव परिसर, कसबा बावडा नदी घाट या परिसरात मोहिम राबवली. तसेच मातंग वसाहत झोपडपट्टी येथेही औषध फवारणी करण्यात आली.

महापालिकेच्यावतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी सहभाग नोंदवला.
कोल्हापूर : महापालिकेच्या स्वच्छता अभियानात रविवारी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. मोहिमेचा सलग ५७ वा रविवार ठरला. दिवसभरात चार टन कचरा उठाव करण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्सीने मोहिम राबवण्यात आली. लॉकडाऊनमुळे नागरीक स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होवू शकत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल केल्याने मोहिमेमध्ये आता नागरीक सहभागी होत आहेत.
आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, जयंती पंपींग स्टेशन, पंचगंगा नदी घाट, रिलायन्स मॉल पिछाडीस परिसर, बोंद्रेनगर, रंकाळा तलाव परिसर, कसबा बावडा नदी घाट या परिसरात मोहिम राबवली. तसेच मातंग वसाहत झोपडपट्टी येथेही औषध फवारणी करण्यात आली. या मोहिमेत ५ जेसीबी, ६ डंपर, ६ आरसी गाड्या, १ पाण्याचा टँकर, २ औषध फवारणी करणारे टँकर आणि ८० कर्मचारी अशी महापालिकेची यंत्रणा होती. यावेळी अतिरिकत आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त अवधूत कुंभार, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, प्रमोद माजगांवकर, अमित देशपांडे उपस्थित होते.
कारेोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कसबा बावडा येथील जिल्हा सत्र न्यायालयाची संपूर्ण इमारत परिसरात औषध फवारणी केली.