शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात जीप कोसळून दोन ठार

By admin | Updated: July 15, 2015 01:18 IST

वारूळजवळ अपघात : दोन जखमी, सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील

आंबा : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर वारूळ (ता. शाहूवाडी) येथील कडवी नदीच्या पुलावरून सुमारे शंभर फूट खोल पात्रात बोलेरो कोसळून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले, तर दोघेजण जखमी झाले. मंगळवारी रात्री दहा वाजता हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमी व मृत नांदिवडे ( जि. रत्नागिरी) येथील आहेत. जखमींना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. शाहूवाडी पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे. अपघातील एकजण बेपत्ता असल्याची भिती व्यक्त होत आहे.बिपीन शिरधनकर आणि प्रभाकर हळदणकर हे कुटुंबियांसमवेत बोलेरो गाडीतून कोल्हापूरहुन रत्नागिरीला जात होते. गाडीमध्ये पाचजण होते. वारूळजवळ गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी नदीपात्रात कोसळली. गाडीतील पाचहीजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरील बहुतेकांनी अपघाताची माहिती वारूळ आणि आंबा येथील तरुणांना कळवली. येथील तरुणांनी तत्काळ धाव घेवून जखमींना रुग्णालयात हलविले. रुग्णालयात उपचार सुरु असताना जखमीपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी असल्याने अरुणा बिपीन शिरधनकर (वय ४५) या फक्त गावाचेच नाव सांगू शकल्या. अरुणा यांना अपघातामुळे धक्का बसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नव्हती. अपघातानंतर तातडीने दिनेश तावरे, शिराज शेख, प्रमोद माळी, प्रशांत मिरजकर, मनोज आडवीळकर, दिनेश कामिरकर आदींनी मदत कार्य केले. दरम्यान, मलकापूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यावरुन एका पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आणि परिचारीकेमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे उपस्थितांतून नाराजी व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)