शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर पालिकेत आरोग्य विभाग धारेवर

By admin | Updated: November 13, 2014 00:01 IST

डेंग्यू रुग्ण : राजकीय पक्ष, संघटनांचे आंदोलन

जयसिंगपूर : शहरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याच्या घटनेनंतर आज, बुधवारी शिवसेना, भाजप, आरपीआय, दलित सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले. डेंग्यूच्या रुग्णाची जबाबदारी कोण घेणार, प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न उपस्थित केला. अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारत प्रश्नांची सरबत्ती केली. काल, मंगळवारी शहरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर आज त्याचे पडसाद शहरात उमटले. शिवसेना, भाजप, आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात आले. मुख्याधिकारी हेमंत निकम हे बाहेरगावी असल्याने प्रभारी उपमुख्याधिकारी एम. एस. चाबुकस्वार यांच्याशी कार्यकर्त्यांनी चर्चा करण्यास सुरुवात केली. शहरात शाळकरी विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाली आहे. प्रशासन काय करीत आहे? असा सवाल उपस्थित केला. संतप्त कार्यकर्त्यांनी प्रभारी उपमुख्याधिकारी चाबुकस्वार, नगर अभियंता सुभाष कोरे, आरोग्य विभागाचे निरीक्षक संदीप कांबळे, आरोग्य विभागप्रमुख व पाणीपुरवठा जलनिस्सारणचे पर्यवेक्षक उमेश राठोड, वरिष्ठ लिपिक अनिल तराळ, आदींवर प्रश्नांचा भडिमार केला. याप्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले. शिवसेनेचे अ‍ॅड. संभाजीराजे नाईक म्हणाले, गेल्यावर्षी नऊ वर्षीय बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही. याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. घडलेल्या घटनेची जबाबदारी नगरपालिकेची आहे. डेंग्यूने मृत्यू झाल्यावरच नगरपालिका उपाययोजना करणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.भाजपचे शहराध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले, शहरात स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येतो. तात्पुरती कार्यवाही करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना राबवा. सुमारे पाऊणतास झालेल्या खडाजंगीनंतर उपमुख्याधिकारी चाबुकस्वार यांनी कार्यकर्त्यांना कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. स्वच्छता मोहीम राबविली जाईल, या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी दालन सोडले. यावेळी भाजपचे संतोष कुलकर्णी, शिवसेनेचे सूरज भोसले, आरपीआयचे अब्दुल बागवान, संजय निकाळजे, सुनील शिंदे, अरविंद मिरजे, रतन शिकलगार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) अन्यथा टाळे ठोकूशहरात कचरा उठाव केला जात नाही, स्वच्छता केली जात नाही, अशा तक्रारींचा कार्यकर्त्यांनी पाढा वाचला. पालिकेकडून कोणतीच कारवाई न झाल्यास नगरपालिकेला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.घाणीचे साम्राज्यआरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मच्छी मार्केटमध्ये येऊन पाहणी केली. नागरीवस्तीमध्ये मटण मार्केटची अस्वच्छता, शौचालय, गटारी, आदी ठिकाणी सुरेश शिंगाडे व सुजित दानोळे यांनी परिसरात असलेली अस्वच्छता दाखविली. यावेळी घाणीचे साम्राज्य पाहून अधिकाऱ्यांनी नाकाला रुमाल लावला.