जयकुमार गोरेंंवर वाहन चोरीचा गुन्हा

By Admin | Updated: November 5, 2014 00:23 IST2014-11-05T00:21:21+5:302014-11-05T00:23:54+5:30

आता भाऊबंदकीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

Jaykumar Gornenwane vehicle theft crime | जयकुमार गोरेंंवर वाहन चोरीचा गुन्हा

जयकुमार गोरेंंवर वाहन चोरीचा गुन्हा

सातारा : आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे भाऊ अंकुश गोरे यांनी दहिवडी येथून टाटा सफारी चोरून नेल्याची तक्रार शेखर गोरे यांच्या स्वीय सहायकाने दिली असून, पोलिसांनी या दोघांवर ३७९ कलमान्वये दहिवडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंकुश गोरे यांच्यातर्फे महेश बोराटे यांनी शेखर गोरेंच्याविरोधात धनादेशावरील बनावट सहीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता भाऊबंदकीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेखर गोरे यांचे स्वीय सहायक दत्तात्रय कुंडलिक घाडगे (वय ४२, रा. कोळेवाडी, ता. माण) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ३० आॅक्टोबर २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता दहिवडी येथील शेखर गोरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर टाटा सफारी (एमएच ०४ बीयू १००) उभी केली होती. ही गाडी अंकुश गोरे आणि आमदार जयकुमार गोरे यांनी चोरून नेली असावी, त्यामुळे त्यांच्यावर माझा संशय आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. चवरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Jaykumar Gornenwane vehicle theft crime