शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जयश्री जाधव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:14 IST

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील विजयानंतर आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील विजयानंतर आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार जाधव यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केले. यामध्ये शिवसेनेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले.यावेळी, रश्मी ठाकरे, खासदार संजय मंडलिक, मालोजीराजे, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.

शरद पवार, उपमुख्यमंत्र्यांकडून जयश्री जाधव यांचे अभिनंदनकाल, मंगळवारी आमदार जयश्री जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यांनी या विजयाबद्दल जाधव यांचे अभिनंदन केले. चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapur-north-acकोल्हापूर उत्तर