शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

‘चप्पल मार’ आंदोलनाने जय गोयल यांचा निषेध: शिवसेनेतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 3:48 PM

छत्रपती शिवरायांची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवरायांचा ऐकरी उल्लेख करणाºया लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीतर्फे सोमवारी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी गोयल यांच्या पोस्टरला कोल्हापूरी चपला मार आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी...जय शिवाजी...चा जयघोष करत जय गोयल यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

ठळक मुद्दे ‘चप्पल मार’ आंदोलनाने जय गोयल यांचा निषेध: शिवसेनेतर्फे निदर्शने छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या पुस्तकावर बंदी घाला

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवरायांचा ऐकरी उल्लेख करणाऱ्या लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीतर्फे सोमवारी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी गोयल यांच्या पोस्टरला कोल्हापूरी चपला मार आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी...जय शिवाजी...चा जयघोष करत जय गोयल यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.छत्रपती शिवाजी चौकात शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक एकवटले. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या लेखकाने जाहीर माफी मागावी, तसेच ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्या पक्षाच्या अध्यक्षानी जाहीर माफी मागावी आणि पुस्तकावर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली. यापुढे महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला. लेखकाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.आंदोलनात युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, जयवंत हारुगले, दीपक गौड, किशोर घाटगे, रणजित जाधव, महेश उत्तुरे,दीपक चव्हाण, धनाजी दळवी, अश्विन शेळके, दादू शिंदे, सुनील खोत, अजित राडे, रमेश खाडे,महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, रुपाली कवाळे, पूजा कामते, मंगल कुलकर्णी, गौरी माळतकर, मीनाताई पोतदार,आदी सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर