शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘जलयुक्त शिवार’मुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:34 IST

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेतील प्रभावशाली कामांमुळे पन्हाळा तालुक्यातील वाडीरत्नागिरी व जाखले ही दोन गावे पाणीदार बनली आहेत. तीन ...

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेतील प्रभावशाली कामांमुळे पन्हाळा तालुक्यातील वाडीरत्नागिरी व जाखले ही दोन गावे पाणीदार बनली आहेत. तीन वर्षांपूर्वी ही गावे पाणीटंचाईचा सामना करत होती. गावातील प्राचीन तलावांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. आता हे सर्व चित्र बदलले असून, वाडीरत्नागिरीतील गावतलाव चकाचक झाले आहेत, तर जाखलेतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाणीटंचाईचे नावच या दोन गावांतून गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी म्हणून सोमवारी शासनातर्फे पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात येथील कामांची पाहणी केली असता, कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्शवत असे काम जाखल्यात झाल्याचे दिसले. कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांच्या नेतृत्वाखालील पाहणी दौºयात उपविभागीय जलसंधारण अधिकारी धनाजी पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गोंधळी, जाखलेचे सरपंच सागर माने, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने यांच्यासह वृत्तपत्र प्रतिनिधींनी सहभाग घेतला.जोतिबा डोंगरावरील कर्पूरेश्वर तलावाचा कचरा कोंडाळा झाला होता. जलयुक्त शिवार योजनेतून ३४ लाख रुपये खर्चून या तलावातील गाळ काढून त्याची डागडुजीही केली. आज या तलावाचे सुंदर जलाशयात रुपांतर झाले आहे. तेथे ८ टीसीएम पाणीसाठा आहे. डोंगरावरच यमाई या प्राचीन तलावातही या योजनेतून काम हाती घेतले, तथापि काही काम अजून अपूर्ण असल्याने या तलावाला मात्र अवकळा आली आहे. तेथील जवळच असलेल्या टेकडीवर समतल चरीचे काम झाले असून, यातून डोंगर उतारावरून वाहणारे पाणी अडवण्याचा प्रयोग राबविला आहे.जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाखले गावात गावकºयांनी एकत्र येऊन तब्बल ४८ दिवस सलग श्रमदान करून राळेगणसिद्धी व हिवरेबाजारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गाव जलयुक्त घडवण्याची किमया साधली आहे.गाव आणि आजूबाजूच्या परिसरात डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी पायथ्याला अडवून त्यावर वर्षभर जलसमृद्धी आणि त्यातून गावची समृद्धी साधता येते, हे गावकºयांनी दाखवून दिले आहे. जमिनीत पाणी मुरवण्यासाठी तयार केलेल्या तलाव व ओढ्यांवर उपसाबंदी आहे. गावात बोअर मारता येत नाही. शिवाय घरगुती वापरातून निर्माण होणारे सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; त्यामुळे गावात तुंबलेल्या पाण्याचे डबके सहसा दृष्टीस पडत नाही. यामागे सरपंच सागर माने यांची धडपड कारणीभूत आहे. गावकºयांनी जलयुक्त शिवार अभियानातून पाझर तलावाचे पुनर्जीवन केले, ओढ्यांवर जागोजागी साखळी सिमेंट बंधारे घेतले, डोंगर उतारावरील ओघळ जोडणी प्रकल्प, सीसीटी, वनतळी घेतल्यामुळे आज जाखलेच्या शिवारात पाणी खेळू लागले आहे.गाळामुळे उत्पन्न तिप्पटीने वाढलेगावातील पाझर तलाव, ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनयोजना, लोकसहभागातून राबविले. जवळपास११ हजार ५00 ट्रॉली गाळ लोकसहभागातून काढून शेतात टाकण्यात आला; त्यामुळे ओढ्यामध्ये चांगला पाणीसाठा निर्माण होण्याबरोबरच चांगल्या दर्जाची माती शेतीस मिळाल्याने पिकांचे उत्पन्न तिप्पटीने वाढले आहे.