शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

जयदीपला राष्ट्रीय शिबिरात सुवर्ण पदक

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

पंजाब येथे सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या जयदीप परांजपे याला ब्रिगेडियर विजय यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

रत्नागिरी : येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत असलेला जयदीप रामचंद्र परांजपे हा पंजाब येथे झालेल्या एन. सी. सी.च्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाला होता. विविध उपक्रमात भाग घेतल्याने तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.२ ते १३ जुलै या कालावधीत अमृतसर (पंजाब) येथे एनसीसीचे राष्ट्रीय शिबिर झाले. यात जयदीप याच्याबरोबरच विवेक जुवळे आणि प्रसाद पाचकुडे या दोन विद्यार्थ्यांचा समावेश होता. या शिबिरात २३ राज्यांचा सहभाग होता. कोकणातून या तिघांची निवड झाली होती. या कालावधीत गायन, नृत्य, आदी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच रस्सीखेच, रनिंग, रिले, फायरिंग या विविध उपक्रमांचा समावेश होता. यात गायनात वैयक्तिक स्तरावर भाग घेत जयदीप याने सुवर्णपदक मिळविले तसेच जयदीप याचा सहभाग असलेल्या समूह नृत्यालाही सुवर्णपदक मिळाले. या तिघांबरोबरच उर्वरित जिल्ह्यातील १३ जणांचा समावेश होता.त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या २० मिनिटांच्या कार्यक्रमाचेही उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. एनसीसीचे शिक्षक, गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे शिक्षक तसेच प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे जयदीप याने सांगितले. जयदीप याने केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरात अभिनंदन होत आहे. जयदीप उत्कृष्ट तबलापटू, आॅक्टोपॅड वादक आहे. तसेच बुद्धिबळ, व्हॉलिबॉलपटू आहे. त्याला गायनाचा छंद आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)पंजाब येथे सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या जयदीप परांजपे याला ब्रिगेडियर विजय यांच्या हस्ते गौरविण्यात आले.