शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: आजऱ्यातील जाधेवाडीकर ग्रामस्थ-क्रेशर कामगारांमध्ये धुमचक्री, चारजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 18:25 IST

आजरा पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते. 

रवींद्र येसादे भादवण : आजरा तालुक्यातील जाधेवाडी गावाजवळील क्रेशरचे काम बंद करण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांमध्ये अन् क्रेशर कामगारांमध्ये धुमचक्री उडाली. यात चार ग्रामस्थ जखमी झाले. याबाबत आजरा पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते. याबाबत माहिती अशी की, जाधेवाडी जवळ राजेंद्रसिंह भांबो इन्फा प्रा. लि. कंपनीचा क्रेशरचे काम सुरु आहे. क्रेशर बंद करावे या मागणीसाठी ग्रामस्थ गेली दोन महिने प्रयत्न करीत आहेत. मात्र क्रेशरचे काम सुरुच आहे. यातच आज, बुधवारी सकाळच्या सुमारास खडी फोडण्यासाठी कंपनीने सुरुंग लावला. याचा मोठा स्फोट झाल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली. काही ग्रामस्थ खडी क्रेशर बंद करा असे सांगण्यासाठी घटनास्थळी गेले. यावेळी क्रेशर कामगार अन् ग्रामस्थांमध्ये प्रंचड वादावादी व हाणामारी झाली. यात उपसरपंच रघुनाथ सावंत, ईश्वर निंगाप्पा सुतार, विश्वास मारुती करडे हे जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे नेण्यात आले. दरम्यान  या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे, सहाय्यक फौजदार बी. एस कोचरगी हे राज्य रिझर्व्ह पोलिस दलाची तुकडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना पाहताच दोन्ही बाजूचा तणाव निवळला. उशिरापर्यंत दोन्ही बाजूकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस